Rain Forecast Agrowon
हवामान

Rain Forecast Maharashtra : राज्यात वाढणार पावसाचा जोर

Monsoon Rain News : पावसाने उघडीप दिल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे. विदर्भात वारा पस्तिशीपार असून, उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे.

अमोल कुटे

Pune News : पावसाने उघडीप दिल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे. विदर्भात वारा पस्तिशीपार असून, उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. आज (ता. २१) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथा, लातूर, नांदेडमध्ये जोरदार सरींची शक्यता आहे. तसेच उर्वरित कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

पश्‍चिम राजस्थानमध्ये ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, या प्रणालीची तीव्रता कमी होत आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानातील ठळक कमी दाबाच्या केंद्रापासून चुरू, बरेली, लखनौ, गया, बंकुरा, हल्दिया ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

दक्षिण कर्नाटक ते आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यादरम्यान पूर्व आणि पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचे जोडक्षेत्र तयार झाले आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात गुरुवारपर्यंत (ता. २४) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

रविवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण आणि घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस सुरूच आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाची उघडीप असल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.७ अंश तापमानाची नोंद झाली. ‎‎तर अकोला, ‎चंद्रपूर, ‎नागपूर आणि ‎वर्धा येथे तापमान ३५ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

आज (ता. २१) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथा, लातूर, नांदेड जिल्ह्यात जोरदार सरींची शक्यता आहे. तसेच कोकणातील मुंबई, ठाणे, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता कायम आहे.

रविवारी (ता. २०) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२९.८---२१.४

अहिल्यानगर---३२.९---२१.७

‎‎धुळे---३२.५---२०.०

जळगाव---३४.५---२३.४

जेऊर---३४.५---१९.५

‎‎कोल्हापूर---२८.०---१७.६

‎महाबळेश्‍वर---२०.८---१७.६

मालेगाव---३४.२---२२.४

‎‎नाशिक---२९.८---२१.४

‎निफाड---३२.०---२१.०

‎सांगली---३०.९---२२.४

‎सातारा---३०.२---२२.६

‎सोलापूर---३३.०---२३.९

‎सांताक्रूझ---३१.९---२७.०

डहाणू---३३.२---२५.९

‎रत्नागिरी---३०.०---२४.५

‎छत्रपती संभाजीनगर---३३.६---२३.२

‎धाराशिव---३१.२---२१.४

‎परभणी---३२.९---२५.०

परभणी (कृषी)---३१.७---२४.१

‎‎अकोला---३५.२---२५.६

अमरावती---३४.०---२४.०

‎भंडारा---३४.०---२४.०‎‎

बुलडाणा---३०.०---२३.१

‎ब्रह्मपुरी---३५.७---२६.४

‎चंद्रपूर---३५.२---२५.२

‎गडचिरोली---३२.४---२४.२

‎गोंदिया---३४.०---२४.६

‎नागपूर---३५.०---२६.२

‎वर्धा---३५.०---२६.५

‎वाशीम---३१.०---२३.६

‎यवतमाळ---३२.४---२४.४

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, लातूर, नांदेड.

३५ अंशांपेक्षा अधिक तापमान असेलेली ठिकाणे :

‎ब्रह्मपुरी ३५.७, ‎‎अकोला ३५.२, ‎चंद्रपूर ३५.२, ‎नागपूर ३५, ‎वर्धा ३५.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मुंबई, ठाणे, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT