Rain Update Agrowon
हवामान

Rain Alert: राज्यात वादळी पावसाचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी देणका देणार ?

Rain Forecast: राज्यातील काही भागात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण आहे. मागील दोन दिवसांपासून दुपारपर्यंत उन्हाचा चटका आणि दुपारनंतर वादळी पाऊस हजेरी लावत आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील काही भागात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण आहे. मागील दोन दिवसांपासून दुपारपर्यंत उन्हाचा चटका आणि दुपारनंतर वादळी पाऊस हजेरी लावत आहे. पुढील चार दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. 


विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात पुढील ४ चार दिवस काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला.

मराठवाड्यातही काही भागात पावसाचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशीव, नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. 


मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यात पुढील ५ दिवस विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे.

खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पुढील ५ दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT