Rain In Maharashtra Agrowon
हवामान

Ratnagiri Rain Update : ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची हजेरी

पावसामुळे तुडतुड्यासह अन्य किडी व रोग आंब्याच्या मोहोरावर आढळून येण्याची भीती बागायतदारांना सतावू लागली आहे.

Team Agrowon

Ratnagiri Rain News : हवामान विभागाच्या (Weather Department) अंदाजानुसार शुक्रवारी (ता. १७) पहाटेच्या सुमारास ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र वादळी पावसाने हजेरी लावली. दुपारपर्यंत ढगाळ वातावरण (Cloudy Weather) होते.

त्यामुळे आंबा बागायतदार धास्तावले असून किडी-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यापासून हापूस सुरक्षित ठेवण्यासाठी कीडनाशक फवारणीचा खर्च बागायतदारांना करावा लागणार आहे.

हवामान विभागाने १८ मार्चपर्यंत जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविली होती. त्याप्रमाणे बुधवारी (ता. १५) रात्री रत्नागिरीत काही ठिकाणी हलका पाऊस पडला.

गुरुवारी (ता. १६) दिवसभर हवेत गारवा होता. दुपारी उन्हाचा कडाका जाणवत होता; मात्र सायंकाळी ढगाळ वातावरण तयार झाले. रात्रीही उष्मा अधिक जाणवू लागला.

शुक्रवारी (ता. १७) पहाटेच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. पावसाची हलकी सरही पडू लागली. सुमारे अर्धा तास पावसाची रिपरिप सुरू होती. साडेचारच्या सुमारास वातावरण शांत झाले. हवेत गारवाही जाणवू लागला.

सकाळी ११ पर्यंत आकाश ढगाळलेले होते. त्यानंतर हळूहळू ऊन वाढू लागले; परंतु हलके वारे वाहत असल्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती.

रत्नागिरी तालुक्यात कोतवडे, गणपतीपुळे, पावस, मजगाव, खाडी पट्टा यासह संगमेश्‍वर, लांजा, राजापुरातील काही भागांत पावसाने हजेरी लावली.

पावसामुळे तुडतुड्यासह अन्य किडी व रोग आंब्याच्या मोहोरावर आढळून येण्याची भीती बागायतदारांना सतावू लागली आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी कीडनाशक फवारणी करण्याचा खर्च बागायतदारांना करावा लागणार आहे.

काही बागायतदारांनी तत्काळ फवारणी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांत पहिल्या टप्प्यातील आंबा बाजारात पाठवण्यास रत्नागिरीतील बागायतदारांनी सुरुवात केली आहे.

अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कीडरोगांचा प्रादुर्भाव शक्य आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कीडनाशक फवारणी आवश्यक आहे. दुपारी कडकडीत ऊन पडले तर आंबा रोगांपासून काही अंशी सुरक्षित राहील.
राजेंद्र कदम, आंबा बागायतदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavistar Ai App: ‘कृषी’कडून शेतकऱ्यांसाठी ‘महाविस्तार एआय’ ॲप

California Import Ban: कॅलिफोर्नियातून आलेले कंटेनर पाठवले परत

Crop Loan: कर्जदार ९४ हजार शेतकऱ्यांना परतफेडीची चिंता

Farmer Protest: ‘शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या’

Sugar Commissioner: राज्याच्या साखर आयुक्तपदी डॉ. संजय कोलते यांची नियुक्ती

SCROLL FOR NEXT