Rain Alert Agrowon
हवामान

Rain Prediction: राज्यात वादळी पावसाचा इशारा कायम

IMD Forecast: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.

अमोल कुटे

Pune News: वादळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे तापमानात घट झाली आहे. आज (ता. ८) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रापासून मध्य प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच रायलसिमा, तमिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आंध्र प्रदेशातील नंद्याल येथे देशातील उच्चांकी ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात वादळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली आहे. कोकणातील ठाणे, रायगड, पालघर, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नाशिक, जळगाव, धुळे, नगर आणि पुणे, तसेच मराठवाड्यातील परभणी, संभाजीनगर जिल्ह्यात पावसाची नोंद झाली.

बुधवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ‎मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ४१ अंश तापमानाची नोंद झाली. ‎अकोला, ‎सोलापूर, धाराशिव आणि ‎ब्रह्मपुरी येथे ४० अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. ‎जेऊर, मालेगाव, चंद्रपूर, नागपूर, वाशीम आणि ‎यवतमाळ येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. ढगाळ आकाश आणि पावसाळी हवामानामुळे तापमानात घट झाली आहे. बहुतांश ठिकाणी तापमान ४० अंशांच्या खाली आले आहे.

‎आज (ता. ८) कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर आणि नांदेड तसेच विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा ( येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

‎बुधवारी (ता. ७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---३७.२---२२.८

‎‎धुळे---४१.०---१७.०

‎जळगाव---३७.८---१९.८

‎जेऊर---३९.०---१९.५

‎कोल्हापूर---३६.५---२३.२

‎महाबळेश्वर---३०.७---१४.४

‎मालेगाव---३९.२---२१.०

‎नाशिक---३५.३---१८.७

‎निफाड---३७.१---१६.८

‎सांगली---३७.४---२२.३

‎सातारा---३७.२---२१.६

‎सोलापूर---४०.२---२५.१

‎सांताक्रूझ---३४.०---२७.८

डहाणू---३५.८---२१.५

‎रत्नागिरी---३४.५---२३.०

‎छत्रपती संभाजीनगर---३६.५---२१.६

‎धाराशिव---४०.०---२२.४

‎परभणी---३८.०---२१.५

‎परभणी (कृषी)---३८.८---१८.४

‎अकोला---४०.३---२१.४

अमरावती---३८.४---२०.७

‎‎भंडारा---३७.६---२२.०

बुलडाणा---३७.०---२०.६

‎ब्रह्मपुरी---४०.०---२३.४

‎चंद्रपूर---३९.०---२६.८

गडचिरोली---३८.०---२३.०

‎गोंदिया---३६.६---२३.०

‎नागपूर---३९.०---२२.०

‎वर्धा---३८.५---२२.९

‎वाशीम---३९.५---निरंक

‎यवतमाळ---३९.४---२२.४

सरासरी तापमान (अंश से.) ‎विभाग---किमान---कमाल ‎विदर्भ---२१.४---४०.३ ‎मराठवाडा---१८.४---४०.० ‎पश्‍चिम महाराष्ट्र---१४.४---४०.२ ‎उत्तर महाराष्ट्र---१६.८---४१.५ ‎कोकण---२१.५---३५.८

वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी.

मध्य महाराष्ट्र : नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

‎४० अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

‎‎‎‎धुळे ४१, ‎अकोला ४०.३, ‎सोलापूर ४०.२, धाराशिव ४०, ‎ब्रह्मपुरी ४०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wildlife Conservation: पाच एकर शेती वन्यजीवांसाठी राखीव

Ashadhi Wari 2026: तुकोबारायांच्या पालखीचे सात जुलैला प्रस्थान

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती नव्हे, कर्जवसुली योजना

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

SCROLL FOR NEXT