Weather Update  Agrowon
हवामान

Weather Forecast : विदर्भ, मराठवाड्यात, वादळी पावसाचा इशारा

Rain Update : ढगाळ हवामानामुळे राज्याच्या कमाल तापमानात काहीशी घट झाल्याचे दिसून आले आहे.

अमोल कुटे

Pune News : पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान होत आहे. ढगाळ हवामानामुळे राज्याच्या कमाल तापमानात काहीशी घट झाल्याचे दिसून आले आहे. आज (ता. ९) विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्रातही विजांसह पावसाची शक्यता आहे.

मराठवाडा आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तर आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीपासून रायलसीमा ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

विदर्भासह राज्यात ढगाळ आकाश होत आहे. विदर्भात कमाल तापमान चाळिशीच्या खाली आले आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमान चाळिशीपार आहे. सोमवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर राज्यातील उच्चांकी ४२.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

वादळी पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. ९) विदर्भ, मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याची शक्यता आहे.

सोमवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३८.५, धुळे ४०.०, जळगाव ३९.४, कोल्हापूर ३८.६, महाबळेश्वर ३२.६, मालेगाव ४१.२, नाशिक ३६.४, निफाड ३६.०, सातारा ३८.८, सोलापूर ४२.२, सांताक्रूझ ३६.६, डहाणू ३३.६, रत्नागिरी ३३.९,

छत्रपती संभाजीनगर ३७.४, बीड ४०.४, नांदेड ४०.२, धाराशिव ४०.०, परभणी ३९.४, अकोला ३९.२, अमरावती ३६.२, बुलडाणा ३६.६, ब्रह्मपुरी ३९.८, चंद्रपूर ३९.८, गडचिरोली ३७.४, गोंदिया ३१.६, नागपूर ३२.५, वर्धा ३४.८, वाशीम ३९.६, यवतमाळ ३८.०.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

४० अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

सोलापूर ४२.२, मालेगाव ४१.२, बीड ४०.४, नांदेड ४०.२, धुळे ४०, धाराशिव ४०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Politics: दानवेंच्या उमेदवारीवरून धुसफूस

Labour Insurance Issue: ‘स्मार्ट’च्या कामात कामगार इन्शुरन्समध्ये चलाखीचा संशय

Maharashtra River Rejuvenation: अखेर नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन

POCRA Research Agreement: ‘पोकरा’अंतर्गत संवर्धित शेतीसाठी संशोधन करार

Supe Water Supply Scheme: डोक्यावरील हंडा उतरणार !

SCROLL FOR NEXT