Rain Alert Agrowon
हवामान

Rain Alert: राज्यात वादळी पावसाचा इशारा; विदर्भ, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

Weather Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यात वादळी पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच उन्हाचा कडाकाही जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव, हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी उद्यापासून पुढील ४ दिवस विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला. यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारेही वाहतील. तसेच दुपारी उन्हाचा चटकाही जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

विदर्भातील अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदीया, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात आजपासून ३ दिवस काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी हलक्या सरी पडतील. तर वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी आजपासून ४ दिवस विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात उद्यापासून ४ दिवसा काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात आजपासून पुढील ५ दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. यावेळी वादळी वारेही वाहतील. 

कोकणातील सिंधूदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी उद्यापासून विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या सरी पडतील. वादळी पावसाचा अंदाज आहे. तसेच राज्यात उन्हाचा चटकाही कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT