Rain Alert Agrowon
हवामान

Rain Alert: राज्यात वादळी पावसाचा इशारा; वर्धा, यवतमाळ,चंद्रपूरमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्याच्या काही जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच आहे. आज (ता. १७) राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. विदर्भातील वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. राज्याच्या विविध भागांत पूर्वमोसमी वादळी पावसाने तडाखा दिला आहे. कोकणातील पालघर, रायगड, मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, मराठवाड्यातील लातूर, तसेच विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यांत विविध ठिकाणी पावसाची नोंद झाली. पावसाच्या हजेरीने तापमानात चढ-उतार सुरू आहेत.

शुक्रवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४१ अंश तापमानाची नोंद झाली. ‎ब्रह्मपुरी येथे ४० अंशांपेक्षा अधिक, तर ‎‎‎‎अकोला, अमरावती, गोंदिया, गडचिरोली येथे ३८ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. धुळे, ‎जळगाव, ‎‎सोलापूर, ‎‎परभणी, ‎नागपूर, ‎वर्धा, ‎वाशीम, ‎यवतमाळ येथे पारा ३७ अंशांच्या वर होता.

आज (ता. १७) संपूर्ण विदर्भासह, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. तर विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता कायम आहे.

मॉन्सून ‘जैसे थे’

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरुवारी (ता. १५) दक्षिण अरबी समुद्रासह, मालदीवचा काही भाग, श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत प्रगती केली आहे. अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागरातही मॉन्सूनने चाल केली आहे. शुक्रवारी मॉन्सूनची वाटचाल ‘जैसे थे’ होती. वाटचालीस पोषक हवामान असल्याने पुढील दोन दिवसांत अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागासह, संपूर्ण अंदमान बेटांवर मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे.

‎शुक्रवारी (ता. १६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---३५.६---२३.८

अहिल्यानगर---३४.०---२३.५

‎‎धुळे---३७.०---२१.५

‎जळगाव---३७.५---२५.७

‎जेऊर---३५.५---२१.०

कोल्हापूर---३३.५---२४.१

‎महाबळेश्‍वर---२६.८---१८.४

‎मालेगाव---३४.२---२४.०

‎नाशिक---३२.३---२३.१

‎निफाड---३५.१---२२.५

‎सांगली---३४.६---२५.१

‎सातारा---३४.६---२५.१

सोलापूर---३७.४---२२.४

‎सांताक्रूझ---३४.४---२७.७

डहाणू---३५.७---२७.०

‎रत्नागिरी---३४.६---२६.६

‎छत्रपती संभाजीनगर---३५.२---२४.६

‎धाराशिव---३५.१---२०.०

‎परभणी---३७.४---२४.९

परभणी (कृषी)---३७.६---२३.५

‎अकोला---३८.५---२७.७

अमरावती---३८.४---२५.५

‎‎‎बुलडाणा---३५.०---२५.०

‎ब्रह्मपुरी---४०.५---२७.६

‎चंद्रपूर---४१.०---२६.०

‎गडचिरोली---३८.०---२५.६

‎गोंदिया---३८.४---२७.२

‎नागपूर---३७.५---२६.९

‎वर्धा---३७.०---२६.२

‎वाशीम---३७.४---निरंक

‎यवतमाळ---३७.४---२५.६

‎वादळी पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर.

वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

३८ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

‎‎चंद्रपूर ४१, ब्रह्मपुरी ४०.५, अकोला ३८.५, अमरावती ३८.४, गोंदिया ३८.४, ‎गडचिरोली ३८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT