Rain Update  Agrowon
हवामान

Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Rain Forecast : राज्यात उन्हाचा चटका असह्य होत असतानाच वादळी पावसाला पोषक हवामान झाले आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात उन्हाचा चटका असह्य होत असतानाच वादळी पावसाला पोषक हवामान झाले आहे. सोलापूर येथे राज्याचे हंगामातील उच्चांकी ४३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ७) विदर्भात उष्ण लाटेचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा आहे. उद्यापासून (ता. ८) विदर्भ, मराठवाड्यात गारपिटीची शक्यता आहे.

दक्षिण छत्तीसगड विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तमिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात सध्या ढगाळ आकाश होत असून, उन्हाच्या झळा, उकाडा कायम आहे. आज (ता. ७) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (येलो अलर्ट), तर उद्यापासून (ता. ८) विदर्भ, मराठवाड्यात गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

शनिवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्याचे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४३.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर चंद्रपूर, वर्धा, ब्रह्मपुरी, यवतमाळ येथे तापमानाचा पारा ४२ अंशांचा पार आहे. आज (ता. ७) विदर्भातील अमरावती, यवतमाळ येथे उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याची शक्यता आहे.

शनिवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३९.६, नगर ३८.८, धुळे ४१, जळगाव ३७.९, कोल्हापूर ४०.२, महाबळेश्‍वर ३३.६, मालेगाव ४०.८, नाशिक ३७.२, निफाड ३६.६, सांगली ४१.०, सातारा ३९.७, सोलापूर ४३.१, सांताक्रूझ ३५.८, डहाणू ३५.५, रत्नागिरी ३१,

छत्रपती संभाजीनगर ३९.४, बीड ४१.५, नांदेड ४०.१, धाराशिव ४०.६, परभणी ४१.४, अकोला ४१.८, अमरावती ४०.६, बुलडाणा ३७.५, ब्रह्मपुरी ४२, चंद्रपूर ४२.४, गडचिरोली ४१.६, गोंदिया ४०.३, नागपूर ४१.४, वर्धा ४२.१, वाशीम ४१.८, यवतमाळ ४२.

-उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :

अमरावती, यवतमाळ.

- वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नंदूरबार, धुळे, नाशिक, जळगाव, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड.

४२ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

सोलापूर ४३.१, चंद्रपूर ४२.४, वर्धा ४२.१, ब्रह्मपुरी ४२, यवतमाळ ४२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT