Weather Udpate Agrowon
हवामान

Rain Forecast : वादळी पावसाचा अंदाज कायम

राज्याच्या भागात बुधवारी (ता. १६) विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली. पोषक हवामान असल्याने पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे.

Team Agrowon

Weather Update पुणे : राज्याच्या भागात बुधवारी (ता. १६) विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाने (Stormy Rain) हजेरी लावली. पोषक हवामान असल्याने पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. आज (ता. १७) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) दिला आहे.

ढगाळ हवामान, पावसाळी वातावरणामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. कोकणातील उष्ण लाट निवळली आहे. गुरुवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ३८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३३ ते ३८ अंशांच्या दरम्यान होते.

उत्तर तमिळनाडू ते उत्तर कोकण पर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बांगलादेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा आहे.

नैॡत्य राजस्थान आणि कच्छ परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे पोषक हवामान झाल्याने आज (ता. १७) राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे, विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

गुरुवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३४.३ (१८.६), जळगाव ३६.४ (१६.८), धुळे ३६ (१६), कोल्हापूर ३५.३ (२०.७), महाबळेश्‍वर २९.१ (१५.८), नाशिक ३२.५ (१७), निफाड ३४.८(१५.०),

सांगली ३५.६ (१८.७), सातारा ३५.६ (१७.७), सोलापूर ३७.९(२३.७), सांताक्रूझ ३६(२६.२), डहाणू ३४ (२३.२), रत्नागिरी ३२.४ (२४.६),

छत्रपती संभाजीनगर २९.२ (१६.१), नांदेड ३५.८ (२१.६), परभणी ३४(१८.८), अकोला ३४.२ (१८.१), अमरावती ३५ (१६.३), बुलडाणा ३२ (१७.२),

ब्रह्मपुरी ३८.२ (२२.६), चंद्रपूर ३५.४ (२२.८), गडचिरोली ३२.४ (१८), गोंदिया ३५ (२२.४), नागपूर ३५.३ (२१.४), वर्धा ३५.५ (२१.९), वाशीम ३७.६ (१९.८), यवतमाळ ३६.२ (१९.६).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर,

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम.

यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT