Weather Agrowon
हवामान

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

Weather Update : राज्यात वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. विदर्भात उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. आज (ता. १९) राज्यात वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३७.३ अंश तापमानाची नोंद झाली. अकोला, चंद्रपूर, अमरावती येथे ३५ अंशापेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. विदर्भासह राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, अनेक ठिकाणी तापमान ३३ अंशांच्या पार गेले आहे. आज (ता. १९) राज्यात वादळी वारे, विजांसह, पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने वर्तविला आहे.

शुक्रवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.९, अहिल्यानगर ३१.२, जळगाव ३३.४, कोल्हापूर २९.२, महाबळेश्वर २४.३, नाशिक ३१.२, निफाड ३०.५, सांगली ३१.१, सातारा ३०.२, सोलापूर ३२.४, सांताक्रूझ ३२.७, डहाणू ३२.०, रत्नागिरी ३०.७, छत्रपती संभाजीनगर ३२.८, बीड ३१.१, धाराशिव ३१.१, परभणी ३३.४, अकोला ३५.५, अमरावती ३५.२, भंडारा ३०.६, बुलडाणा ३०.२, ब्रह्मपुरी ३७.३, चंद्रपूर ३५.४, गडचिरोली ३३.२, गोंदिया ३४, नागपूर ३४.१, वर्धा ३४.५, वाशीम ३४.२, यवतमाळ ३३.

अरबी समुद्रात कमी दाबाची शक्यता

पूर्व मध्य अरबी समुद्रात उत्तर लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. ही प्रणाली पश्चिमेकडे सरकताना आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. या प्रणालीपासून दक्षिण आंध्र प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर अंदमान समुद्र आणि परिसरावर रविवारपर्यंत (ता. २०) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता असून, या वाऱ्यांच्या प्रभावामुळे मंगळवारपर्यंत (ता.२२) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली.

वाशीम : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा.

३५ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

ब्रह्मपुरी ३७.३, अकोला ३५.५, चंद्रपूर ३५.४, अमरावती ३५.२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT