Rain Forecast Agrowon
हवामान

Weather Forecast : विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

Rain Update : विदर्भासह मराठवाड्यात वादळी पाऊस, गारपिटीचा तडाखा कायम आहे. कमाल तापमानातही चढ-उतार होत आहेत.

अमोल कुटे

Pune News : विदर्भासह मराठवाड्यात वादळी पाऊस, गारपिटीचा तडाखा कायम आहे. कमाल तापमानातही चढ-उतार होत आहेत. आज (ता. १४) विदर्भात वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा वाढण्याची शक्यता आहे.

उत्तर गुजरात आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून उत्तर ओडिशापर्यंत हवेचा कमी दाबाचा तयार झाला आहे. कोमोरिन भागातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून केरळ, कर्नाटक कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. शनिवारी (ता. १२) पहाटे विदर्भातील बहुतांश जिल्हे, नांदेड, परभणीसह मराठाड्यात वादळी वारे, विजांसह पाऊस पडला. तर तुरळक ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला.

विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात ढगाळ आकाश होत आहे. आज (ता. १४) विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. राज्याच्या कमाल तापमानातील घट कायम आहे. शनिवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे.

शनिवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३८.६, नगर ३८.२, धुळे ३७.०, जळगाव ३७.०, कोल्हापूर ३६.६, महाबळेश्वर ३१.७, मालेगाव ४०.४, नाशिक ३८.१, निफाड ३६.९, सांगली ३८.२, सातारा ३६.७, सोलापूर ३८.४, सांताक्रूझ ३३.१, डहाणू ३३.६, रत्नागिरी ३३.३,

छत्रपती संभाजीनगर ३५.८, बीड ३५.५, नांदेड ३५.८, परभणी ३६.६, अकोला ३५.८, अमरावती ३३.८, बुलढाणा ३४.६, ब्रह्मपूरी ३०.०, चंद्रपूर ३३.६, गडचिरोली ३१.४, गोंदिया ३१.४, नागपूर ३०.४, वर्धा ३२.४, वाशीम ३४.६, यवतमाळ ३४.५.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT