Storm Warning Agrowon
हवामान

Maharashtra Weather: मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस व गारपीटीचा इशारा

Storm Alert: राज्यात उन्हाची तीव्रता वाढली असतानाच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस व गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तापमान ४२ अंशांच्या पुढे गेल्याने नागरिकांना उष्णतेपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अमोल कुटे

Pune News: तापमानाचा पारा ४२ अंशांवर गेल्याने राज्यात होरपळ वाढली आहे. यातच महाराष्ट्रावर वादळी पावसाचे ढगांचे सावट असून, आज (ता. १) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपीट होण्यात अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

मराठवाडा आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. दक्षिण छत्तीसगडपासून विदर्भ, मध्य महाराष्ट्रापर्यंत, तसेच मराठवाड्यातील चक्राकार वाऱ्यांपासून उत्तर तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या प्रणालीमुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होत असल्याने राज्यात वादळी पाऊस आणि गारपिटीला पोषक वातावरण तयार होत आहे.

दरम्यान सोमवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांत चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला व ब्रह्मपुरी येथे ४२ अंशांपेक्षा अधिक तर गडचिरोली, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, जेऊर येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. ढगाळ आकाशामुळे उकाड्यातील वाढ कायम आहे.

आज (ता. १) मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत वादळी पाऊस गारपिटीची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, सातारा, सांगली, कोल्हापूर, विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती जिल्ह्यात वादळी पावसाच्या अंदाजामुळे सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

सोमवारी (ता. ३१) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३९.०---२१.२

अहिल्यानगर---निरंक---२५.४

धुळे---३९.०---१७.०

जळगाव---४०.२---२०.१

जेऊर---४१.०---२४.०

कोल्हापूर---३८.१---२४.७

महाबळेश्वर---३३.५---२०.४

मालेगाव---३६.८---२०.८

नाशिक---३९.२---२२.७

निफाड---३८.९---२०.२

सांगली---३७.५---२५.६

सातारा---३९.१---२४.१

सोलापूर---४१.१---२७.६

सांताक्रूझ---३५.०---२४.०

डहाणू---३२.७---२६.०

रत्नागिरी---३२.५---२५.२

छत्रपती संभाजीनगर---३९.०---२६.२

धाराशिव---३८.७---२५.०

परभणी---३९.९---२५.५

परभणी (कृषी)---३९.९---२५.५

अकोला---४२.३---२४.०

अमरावती---४१.२---२३.६

भंडारा---३९.६---२२.०

बुलडाणा---३८.८---निरंक

ब्रह्मपुरी---४२.२---२२.१

चंद्रपूर---४२.४---निरंक

गडचिरोली---४१.४---२०.६

गोंदिया---३८.८---१९.६

नागपूर---४१.२---२१.०

वर्धा---४१.२---२२.५

वाशीम---३९.८---निरंक

यवतमाळ---४१.२---२४.०

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---१९.६---४२.४

मराठवाडा---२५.०---३९.९

पश्‍चिम महाराष्ट्र---२०.४---४१.१

उत्तर महाराष्ट्र---१७.०---४०.२

कोकण---२४.०---३५.०

वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती.

४२ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे : चंद्रपूर ४२.४, अकोला ४२.३, ब्रह्मपुरी ४२.२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT