Winter Season Agrowon
हवामान

Winter Weather Update: किमान तापमानात घट होण्याची शक्यता

Weather Forecast: राज्यात अद्यापही थंडीचा कडाका कमीच आहे. किमान तापमानात घट होत असल्याने गारठा पुन्हा वाढू लागला आहे. आजपासून (ता. २४) राज्यात आकाश निरभ्र होत, किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यात अद्यापही थंडीचा कडाका कमीच आहे. किमान तापमानात घट होत असल्याने गारठा पुन्हा वाढू लागला आहे. आजपासून (ता. २४) राज्यात आकाश निरभ्र होत, किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मध्य प्रदेश आणि परिसरावर, तसेच दक्षिण केरळच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहे. वायव्य भारतात १३५ नॉट्स वेगाने पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत कायम आहेत. एकामागोमाग येणाऱ्या पश्‍चिमी चक्रावातांमुळे थंडी कमी-अधिक होत आहे. गुरुवारी (ता. २३) पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे. गेले काही दिवस पहाटे धुक्याची दुलई पाहायला मिळत आहे. गुरुवारी (ता. २२) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात तापमान ९.९ अंश तापमान नोंदविले गेले. उर्वरित राज्यात किमान तापमान १० ते १९ अंशांच्या दरम्यान आहे.

उन्हाचा चटका कमी-अधिक होत असतानाच, गुरुवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर आणि ब्रह्मपुरी येथे ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २४) राज्यात आकाश पुन्हा निरभ्र होत असून, किमान तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. २३) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३२.८---१३.७

अहिल्यानगर---३३---११.४

धुळे---३४---९.५

जळगाव---३१.४---१३

जेऊर---३१.३---१४.३

कोल्हापूर---३४.५---१२.५

महाबळेश्‍वर---२९.५---१६

मालेगाव---निरंक---१३.४

नाशिक---३२.३---१४.८

निफाड---३१.२---११

सांगली---३३.५---१५

सातारा---३३.३---१३.७

सोलापूर---३५.२---१७

सांताक्रूझ---३२.२---१८.५

डहाणू---२८---१९.३

रत्नागिरी---३५---१८

छत्रपती संभाजीनगर---३३---१५

धाराशिव---३१.६---१२.८

परभणी---३३.३---१४.३

परभणी (कृषी)---३२.२---९.९

अकोला---३४.९---१५.८

अमरावती---३२.८---१४.६

भंडारा---३२.४---१५

बुलडाणा---३२.८---१६.६

ब्रह्मपुरी---३५.२---१३.१

चंद्रपूर---३२.२---निरंक

गडचिरोली---३२.६---१३.६

गोंदिया---३१.२---१५

नागपूर---३३.४---१३.२

वर्धा---३२.८---१४.५

वाशीम---३४.२---१८.४

यवतमाळ---३४.२---१४.८

१० अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

धुळे ९.५, परभणी (कृषी) ९.९.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT