Heat Wave  Agrowon
हवामान

Weather Update : तापमान पुन्हा वाढले

Weather News : उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम असला तरी उर्वरित राज्यात मात्र किमान तापमानात वाढ झाल्याने गुलाबी थंडीची प्रतिक्षा कायम आहे.

अमोल कुटे

Pune Weather News : उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम असला तरी उर्वरित राज्यात मात्र किमान तापमानात वाढ झाल्याने गुलाबी थंडीची प्रतिक्षा कायम आहे. आज (ता. २०) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह तापमानात वाढ-घट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर त्रिपुरा आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. श्रीलंकेजवळील चक्राकार वाऱ्यांची स्थिती कोमोरीन भागाकडे सरकली आहे. दक्षिण अंदमान समुद्रात ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राज्यात अंशतः ढगाळ वातावरण होत असून, तापमानात चढ-उतार होत आहे.

राज्यात कमाल तापमानाचा पारा काहीसा खाली आला आहे. रविवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रुझ येथे राज्यातील उच्चांकी ३५.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात बुहतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३१ ते ३५ अंशाच्या दरम्यान आहे.

किमान तापमानाचा पारा कमी-अधिक होत आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमान १६ अंशाच्या खाली आहे. राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज आहे.

रविवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.६ (१६.९), जळगाव ३१.२ (१४.०), कोल्हापूर ३१.२ (२१.१), महाबळेश्वर २७.२ (१७.१), नाशिक ३१.२ (१६.२), निफाड ३०.५ (१२.५), सांगली ३१.४ (२०.७), सातारा ३२.१ (१८.४), सोलापूर ३३.६(२१.७), सांताक्रूझ ३५.२ (२१.८), डहाणू ३३.२ (२०.६), रत्नागिरी ३५.० (२३.३),

छत्रपती संभाजीनगर ३२.० (१७.८), नांदेड ३२.४ (२०.४), परभणी ३२.५ (१९.९), अकोला ३३.४ (१९.०), अमरावती ३१.६ (१७.६), बुलढाणा ३१.५ (१९.०), ब्रह्मपूरी ३४.७ (१८.०), चंद्रपूर ३१.६(१६.२), गडचिरोली ३१.६ (१६.०), गोंदिया ३२.६ (१५.५), नागपूर ३१.६(१६.०), वर्धा ३१.०(१७.५), वाशीम ३३.०(१७.२), यवतमाळ ३४.२ (१६.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT