Weather News Agrowon
हवामान

Weather News : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच

Weather Forecast News : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागल्याने थंडीची चाहूल लागली आहे. विदर्भात गारठा जाणवत असला तरी किमान तापमानात काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Team Agrowon

Maharashtra Weather Update : पुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागल्याने थंडीची चाहूल लागली आहे. विदर्भात गारठा जाणवत असला तरी किमान तापमानात काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आग्नेय अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. राज्याच्या काही भागात उन्हाचा चटका अनुभवायला मिळत असून, ढगाळ हवामानासह उकाड्यातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या किमान तापमानातील वाढ-घट कायम राहण्याचे संकेत आहेत.

बुधवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३४.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान २४ ते ३२ अंशांच्या दरम्यान होते. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १२.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

बुधवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३१.४ (१५.०), जळगाव ३०.२ (१५.२), कोल्हापूर २९.६ (१८.५), महाबळेश्वर २५.३ (१४.४), नाशिक २९.८ (१४.१), निफाड २९.१ (१२.८), सांगली २९.५ (१७.१), सातारा ३०.० (१५.४), सोलापूर ३१.८(१७.५), सांताक्रूझ ३२.१ (१९.४), डहाणू २८.८ (१८.४), रत्नागिरी ३४.३ (२०.३), छत्रपती संभाजीनगर २८.६ (१५.२), नांदेड २९.२ (१७.२), परभणी २९.३ (१६.१), अकोला ३०.६ (१७.०), अमरावती २८.६ (१५.१), बुलडाणा २८.४ (१५.६), ब्रह्मपुरी ३१.३ (१५.६), चंद्रपूर २८.४(१४.०), गडचिरोली २९.० (१३.८), गोंदिया २७.६ (१३.६), नागपूर २८.४(१४.६), वर्धा २८.०(१५.०), वाशीम २९.४ (१४.८), यवतमाळ ३१.० (१५.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT