Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Heatwave: सूर्य तळपला! अकोल्यात राज्यातील उच्चांकी ४२ अंश तापमान

Maharashtra Weather Update: राज्यात उन्हाचा कहर सुरू असून अनेक ठिकाणी तापमान ४० अंशांच्या वर गेले आहे. अकोला येथे सर्वाधिक ४२ अंश तापमानाची नोंद झाली.

अमोल कुटे

Maharashtra Heat Alert: सूर्य तळपल्याने राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान चाळिशीपार गेले आहे. गुरुवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांगली जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली. आज (ता. २८) राज्याच्या कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज असून, दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.

मध्य महाराष्ट्र, अंतर्गत कर्नाटक, उत्तर केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने बुधवारी (ता. २६) सायंकाळनंतर सांगली जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. सांगली आणि मिरज येथे २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होत आहे.

गुरुवारी (ता. २७) अकोलासह ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथे तापमान ४१ अंशांपेक्षा अधिक, तर जळगाव, अमरावती, यवतमाळ, मालेगाव, परभणी, नागपूर, वर्धा, वाशीम येथे तापमान ४० अंशांच्या वर होते. धुळे, जेऊर, सोलापूर, भंडारा आणि गडचिरोली येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यात ढगाळ हवामान असून, चटका आणि उकाडा वाढला आहे. आज (ता. २८) राज्यात कमाल तापमानातील वाढ, उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामानासह सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. २७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३८.६---१९.५

अहिल्यानगर---३८.२---१९.३

धुळे---३९.५---१६.५

जळगाव---४०.४---२३.६

जेऊर---३९.०---२०.०

कोल्हापूर---३५.९---२२.९

महाबळेश्‍वर---३०.७---१८.९

मालेगाव---४०.०---२१.६

नाशिक---३७.७---१९.१

निफाड---३७.९---१५.०

सांगली---३५.५---२०.६

सातारा---३७.७---२१.४

सोलापूर---३९.५---२५.२

सांताक्रूझ---३२.०---२३.०

डहाणू---३३.३---२२.१

रत्नागिरी---३३.०---२५.१

छत्रपती संभाजीनगर---३८.९---२१.२

धाराशिव---३८.०---२१.६

परभणी---४०.०---२३.१

परभणी (कृषी)---३९.१---१९.९

अकोला---४२.०---२२.५

अमरावती---४०.४---२१.४

भंडारा---३९.४---२१.०

बुलडाणा---३८.४---२४.४

ब्रह्मपुरी---४१.९---२०.५

चंद्रपूर---४१.२---निरंक

गडचिरोली---३९.२---१९.०

गोंदिया---३८.८---१८.४

नागपूर---४०.०---२०.६

वर्धा---४०.०---२३.२

वाशीम---४०.०---निरंक

यवतमाळ---४०.४---२३.४

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---१८.४---४२.०

मराठवाडा---१९.९---४०.०

पश्‍चिम महाराष्ट्र---१८.९---३९.५

उत्तर महाराष्ट्र---१५.०---४०.४

कोकण---२२.१---३३.३

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर

४० अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे : अकोला ४२, ब्रह्मपुरी ४१.९, चंद्रपूर ४१.२, जळगाव ४०.४, अमरावती ४०.४, यवतमाळ ४०.४, मालेगाव ४०, परभणी ४०, नागपूर ४०, वर्धा ४०, वाशीम ४०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT