Winter Season Agrowon
हवामान

Weather Update : किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता

Winter Season : उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात थंडी वाढत आहे. धुळे आणि परभणी येथे किमान तापमानाचा पारा १०.५ अशांवर आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात थंडी वाढत आहे. धुळे आणि परभणी येथे किमान तापमानाचा पारा १०.५ अशांवर आहे. किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढू लागला आहे. रविवारी (ता. २४) उत्तर प्रदेशातील हिंदन येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होत असून, रविवारी (ता. २४) धुळे येथील कृषी महाविद्यालयात आणि परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील नीचांकी १०.६ अंश तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमान १३ अंशांपेक्षा खाली आहे. उर्वरीत राज्यात किमान तापमानाचा पारा कमी-अधिक होत आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशाच्या खाली आला आहे. मात्र कोकणासह महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमाल तापमान अद्यापही ३० अंशांच्या पुढे आहे. रविवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे उच्चांकी ३३.५ अंश तापमानाची नोंद झाली. आजपासून (ता. २५) किमान तापमानात हळूहळू घट होण्याची, तसेच राज्याच्या उत्तर भागात गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

रविवारी (ता. २४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३०.३ (१३.४), अहिल्यानगर २९.१ (११.७), धुळे - (१०.६), जळगाव ३०.४ (१३.१), कोल्हापूर २९.० (१७.१), महाबळेश्वर २५.६ (१३.९), मालेगाव २७.० (१३.८), नाशिक ३०.९ (१३.०), निफाड २७.६ (११.५), सांगली ३०.१ (१५.८), सातारा ३०.३ (१४.५), सोलापूर ३१.६ (१७.२), सांताक्रूझ ३३.५ (१९.६), डहाणू ३२.० (१९.१), रत्नागिरी ३३.० (१९.५),

छत्रपती संभाजीनगर २९.४ (१४.०), धाराशिव ३०.१ (१४.६), नांदेड २९.२ (१३.६), परभणी २९.५(१३.५), परभणी कृषी विद्यापीठ २९.२ (१०.६), अकोला ३०.३ (१५.३), अमरावती २९.८ (१५.६), बुलढाणा २७.४ (१५.०), ब्रह्मपूरी ३०.२ (१३.१), चंद्रपूर २८.८ (१५.४), गडचिरोली २८.४ (१३.६), गोंदिया २८.१ (१२.७), नागपूर २९.६ (१३.०), वर्धा २८.८ (१३.४), वाशीम २९.० (-), यवतमाळ ३०.० (-).

१३ अंशापेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

धुळे १०.६, परभणी (कृषी) १०.६, निफाड ११.५, अहिल्यानगर ११.७, गोंदिया १२.७, नाशिक १३, नागपूर १३.

कमी दाबाचे क्षेत्र झाले ठळक

विषूववृत्तीय हिंद महासागरातील कमी दाबाचे क्षेत्र रविवारी (ता.२४) ठळक झाले आहे. वायव्य आणि उत्तर दिशेकडे सरकताना दोन दिवसांत या प्रणालीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. ही प्रणाली तामिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रापासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra ST Bus Service Issues: राजकारणासाठी एसटी प्रवासी वेठीला

MAGNET Projects Schemes: ‘मॅग्नेट’अंतर्गत विविध योजनांचा लाभ घ्यावा

Neem Research Centre: भिडीत कडुलिंब संशोधन केंद्र होणार

MSCB Profit: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ७०२ कोटींचा नफा

NABARD Experience Centre: मुंबईत नाबार्डच्या अनुभव केंद्राचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT