Weather Agrowon
हवामान

Weather Update : किमान तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता

Cold Weather Update : तापमानात घट होत पारा २ ते ३ अंशांनी घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उत्तर भारतात किमान तापमान घसरल्याने थंडीचा कडाका पुन्हा वाढला आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यातील पावसाचे सावट दूर होताच किमान तापमानात घट होऊ लागली आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यात पारा पुन्हा १९ अंशांच्या खाली घसरला आहे. तापमानात घट होत पारा २ ते ३ अंशांनी घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
उत्तर भारतात किमान तापमान घसरल्याने थंडीचा कडाका पुन्हा वाढला आहे.

शुक्रवारी (ता. १२) पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी उणे १.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात थंडी पुन्हा वाढू लागली असून, धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उर्वरित राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान १४ ते २४ अंशांच्या दरम्यान आहे. कोमोरीन आणि मालदीव भागालगत चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. राज्यात किमान तापमानात हळूहळू घट होत थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.७ (१५.२), धुळे ३१ (१४), जळगाव (१६.५), कोल्हापूर ३१.१ (१८.६), महाबळेश्‍वर २७.१ (१५.८), नाशिक ३०.४ (१७.४), निफाड २९.२ (१४), सांगली ३१.७ (१९.१), सातारा ३०.८ (१६.१), सोलापूर ३४.६ (१७.५), सांताक्रूझ ३३.६ (२३.४),

डहाणू २८.४ (२०.४), रत्नागिरी ३४.२ (२१.२), छत्रपती संभाजीनगर २९.४ (१६), नांदेड ३१ (१८.६), परभणी ३१.४ (१६.५), अकोला ३२.२ (१७.८), अमरावती ३० (१७), बुलडाणा २९.४ (१६.४), ब्रह्मपुरी ३१.६ (१७.७), चंद्रपूर ३०.८ (१६.४), गडचिरोली ३०.२ (१६), गोंदिया २८.३ (१५.६), नागपूर २९.२ (१७.१), वर्धा ३१ (१८), वाशीम ३०.८ (१५.८), यवतमाळ ३३ (१९).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jowar Seed Subsidy Scheme: रब्बी ज्वारीच्या बियाणे खरेदीवर सरकारकडून मिळणार ५० टक्के अनुदान; कोणाला मिळणार लाभ? जाणून घ्या अर्ज प्रक्रिया!

El Niño: तीव्र 'एल निनो'चं खरिपानंतर रब्बीवरही सावट, हवामान कसे राहील? शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती

Tamil Nadu Rain: तामिळनाडूत मुसळधार पाऊस, चेन्नई आणि चार जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतील ९२ हजारांहून अधिक अपात्र लाभार्थ्यांकडून वसुलीची मागणी; १५ दिवसांची मुदत

Nashik Sugar Factory Crisis : ‘नासाका’चा १७ कोटींचा ऊस बिल घोटाळा? शेतकऱ्यांची थकीत पैशांसाठी चौकशीची मागणी!

SCROLL FOR NEXT