Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता; तापमानात चढ-उतार सुरूच

Maharashtra Weather : उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढू लागला आहे. तर कोकणात दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. तसेच राज्यातील तापमानात चढ-उतार सुरूच आहेत.

Dhananjay Sanap

Pune News : उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढू लागला आहे. तर कोकणात दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. तसेच राज्यातील तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. पुढील दोन दिवस राज्यात प्रामुख्याने कोरड्या हवामानसह तापमानातील चढ-उतार कायम राहिल अशी शक्यता आहे. तसेच गुरुवारपासून कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरीचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर लातूर, धाराशीव, सोलापुर, पुणे जिल्ह्यात गुरुवार, शुक्रवार, शनिवारी तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे. 

नैऋत्य बंगालच्या उपसागर तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टा आता उत्तर तमिळनाडू आणि लगतच्या दक्षिणेस आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे सरकला आहे. त्यामुळे रायलसीमा, आंध्र प्रदेशची दक्षिण किनारपट्टी, यानम आणि तामिळनाडू भागात अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तर देशातील उत्तरेस मात्र बहुतांश भागात गारठा वाढू लागला आहे. राजस्थानमधील अजमेर येथे नीचांकी १२.४ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. तसेच राज्यात अहमदनगर आणि नाशिक येथे नीचांकी १३.७ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. 

राज्यातील काही भागात पावसाला पोषक स्थिती निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांची काढणी करून घ्यावी. तसेच कापणी केलेल्या पीक झाकून ठेवावे, असा सल्ला हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Third List: कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश

Sugar MSP: साखर 'एमएसपी' प्रश्नी दिल्लीतील बैठक निष्फळ, उद्यापासून महाराष्ट्र-कर्नाटकातील महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Canal Repair : पहिल्या आवर्तनापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करा

Solar Irrigation : सातारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेुळे उजळणार

Water Tanker Surge : टॅंकरच्या संख्येत झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT