Weather Update Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update : कमाल तापमानात चढ-उतार सुरूच ; अनेक ठिकाणी तापमान ३५ अंशांच्या पुढे

IMD Alert : आज (ता. १९) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Team Agrowon

IMD Report : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’च्या चटक्याने तडाखा दिल्यानंतर काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे. आज (ता. १९) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

देशाच्या बहुतांश भागातून मॉन्सून परतला आहे. राजस्थान, हरियानामध्ये चक्राकार वारे वाहत आहेत. अंदमान समुद्रातील चक्राकार वाऱ्यांपासून ते श्रीलंकेपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मॉन्सून परतल्यानंतर राज्याच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे.

अनेक ठिकाणी कमाल तापमान सातत्याने ३५ अंशांच्या पुढे आहे. बुधवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर आणि अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या.

बुधवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३४.४, जळगाव ३४.७, कोल्हापूर ३२.७, महाबळेश्वर २६.७, नाशिक ३३.७, सांगली ३४.४, सातारा ३४.२, सोलापूर ३६.०, सांताक्रूज ३४.६, डहाणू ३४.८, रत्नागिरी ३२.६, छत्रपती संभाजीनगर ३४.०, नांदेड ३४.४, परभणी ३४.४, अकोला ३६.०, अमरावती ३५.०, बुलडाणा ३३.५, ब्रह्मपुरी ३५.८, चंद्रपूर ३४.०, गडचिरोली ३४.०, गोंदिया ३४.०, नागपूर ३३.८, वर्धा ३४.५, वाशीम ३५.२, यवतमाळ ३५.२.

अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्र

पूर्व-मध्य अरबी समुद्रात बुधवारी (ता. १८) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. उद्यापर्यंत (ता. १९) ही प्रणाली आणखी तीव्र होईल. शनिवारपर्यंत अरबी समुद्रात तीव्र कमी दाब क्षेत्राची (डिप्रेशन) निर्मिती होण्याची शक्यता आहे.

आग्नेय बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उद्यापर्यंत (ता. २०) या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT