Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी, पावसाला पोषक हवामान

Fengal Cyclone : बंगालच्या उपसागरातील ‘फेइंजल’ चक्रीवादळामुळे राज्यात ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान झाले आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात गारठा काहीसा कमी झाला आहे.

Team Agrowon

Pune News : बंगालच्या उपसागरातील ‘फेइंजल’ चक्रीवादळामुळे राज्यात ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान झाले आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात गारठा काहीसा कमी झाला आहे.

उत्तर महाराष्ट्रात मात्र हुडहुडी कायम असल्याचे चित्र आहे. आज (ता. २) राज्यात ढगाळ हवामानासह किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत आहे. रविवारी (ता. १) मध्य प्रदेशातील नवगांव येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

राज्यात थंडी काहीशी कमी झाली असली, तरी धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी ६.१ अंश तापमानाची नोंदले गेले. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १०.५ अंशांची नोंद झाली. उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ होत आहे.

रविवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३४.२ अंश तापमानाची नोंद झाली. आज (ता. २) राज्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून, किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. यातच कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, आणि मराठवाड्याच्या धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

रविवारी (ता. १) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे २९.१ (१३.४), अहिल्यानगर २८.२ (१४.७), धुळे २७.५ (६.१), जळगाव २९.२ (११.८), जेऊर ३०, कोल्हापूर २७.९ (१९.२), महाबळेश्‍वर २५.१ (१४.१), मालेगाव २५.६ (१२.६), नाशिक २७.७ (११.५), निफाड २७.२ (१०.५), सांगली २९ (१८.१), सातारा (१५), सोलापूर ३२.० (२०.६), सांताक्रूझ ३३.३ (१७.८), डहाणू २९.६ (१६.७), रत्नागिरी ३४.२ (२०.१),

छत्रपती संभाजीनगर २८.२ (१६), बीड २६.९ (-), धाराशिव २७.८ (१७.२), परभणी २९.४ (१७.०), परभणी कृषी विद्यापीठ २८.५ (१८.४), अकोला ३०.४ (१६.४), अमरावती ३० (१७), भंडारा २९ (१७), बुलडाणा २६.८ (१६), ब्रह्मपुरी ३१.२ (१४), चंद्रपूर २८.८ (१३.५), गडचिरोली २९.६ (१३.४), गोंदिया २८.८ (१६.२), नागपूर ३०.४ (१८.५), वर्धा (१९), वाशीम २८.२ (१४), यवतमाळ २९.२.

‘फेइंजल’ चक्रीवादळ निवळले

‘फेइंजल’ चक्रीवादळ जमिनीवर आले असून, उत्तर तमिळनाडूच्या किनाऱ्यावर सक्रिय असून, पदुच्चेरी जवळ असलेली प्रणाली पश्‍चिमेकडे सरकत आहे. या वादळाची तीव्रता कमी होऊ लागली आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे दक्षिणेकडील राज्यामध्ये जोरदार पाऊस सुरू असून, महाराष्ट्रात हवामान ढगाळ झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT