Summer Heat Agrowon
हवामान

Heatwave Alert: विदर्भात उन्हाचा चटका वाढणार; अकोला येथे उच्चांकी ४०.२ अंश सेल्सिअसची नोंद

Maharashtra Weather Update: राज्यात तापमान पुन्हा वाढू लागले आहे. अकोला येथे तब्बल ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा चटका अधिक जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अमोल कुटे

Pune News: सूर्य तळपू लागल्याने कमाल तापमान पुन्हा चाळिशीपार गेले आहे. मंगळवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २६) राज्याच्या तापमानात वाढ होण्याचा, तसेच विदर्भात उन्हाचा चटका वाढण्यात अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दक्षिण छत्तीसगडपासून महाराष्ट्र, अंतर्गत कर्नाटक ते उत्तर तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मंगळवारी (ता. २५) अकोलासह चंद्रपूर, जेऊर, अमरावती, जळगाव, मालेगाव, ब्रह्मपुरी, आणि वर्धा येथे तापमान ३९ अंशांच्या वर होते. पुणे, धुळे, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि वाशीम येथे ३८ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

राज्यात ढगाळ हवामान असून, उकाडा जाणवत आहे. किमान तापमानातही चढ-उतार सुरू आहे. सोमवारी (ता. २४) सायंकाळनंतर सोलापूर, सांगली जिल्ह्यांसह तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. आज (ता. २६) राज्यात उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामानाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. २५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३८.२---१८.६

अहिल्यानगर---३७.९---१५.७

धुळे---३८.५---१५.०

जळगाव---३९.३---१६.४

जेऊर---३९.५---१९.०

कोल्हापूर---३७.५---२४.६

महाबळेश्‍वर---३२.७---१९.६

मालेगाव---३९.२---१९.२

नाशिक---३७.०---१७.८

निफाड---३७.३---१२.८

सांगली---३८.३---२४.४

सातारा---३७.७---१९.९

सोलापूर---३८.९---२३.४

सांताक्रूझ---३३.०---२२.७

डहाणू---३५.४---२१.६

रत्नागिरी---३३.५---२३.३

छत्रपती संभाजीनगर---३८.५---१९.५

धाराशिव---३७.०---२०.६

परभणी---३८.८---२०.१

परभणी (कृषी)---३७.५---१६.०

अकोला---४०.२---२०.३

अमरावती---३९.४---१९.८

भंडारा---३७.०---१९.०

बुलडाणा---३७.०---२२.५

ब्रह्मपुरी---३९.०---१९.०

चंद्रपूर---३९.८---निरंक

गडचिरोली---३६.४---१९.२

गोंदिया---३६.५---१७.४

नागपूर---३७.६---१८.४

वर्धा---३९.०---१९.०

वाशीम---३८.२---निरंक

यवतमाळ---३७.८---२१.२

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---१७.४---४०.२

मराठवाडा---१६.०---३८.८

पश्‍चिम महाराष्ट्र---१८.६---३९.५

उत्तर महाराष्ट्र---१२.८---३९.३

कोकण---२१.६---३५.४

३९ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

अकोला ४०.२, चंद्रपूर ३९.८, जेऊर ३९.५, अमरावती ३९.४, जळगाव ३९.३, मालेगाव ३९.२, ब्रह्मपुरी ३९, वर्धा ३९.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT