Weather Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Weather: थंडीचा कडाका कमीच राहणार; राज्यातील बहुतांशी भागात उन्हाचा चटका वाढला

Winter Weather Forecast: उत्तर भारतातील काही भागात थंडी कमी जास्त होत आहे. तर राज्यातील तापमानात चढ उतार सुरुच आहेत. राज्यात आजही थंडी कमीच होती. तर दुपारी उन्हाचा चटकाही अनेक भागात जाणवत आहे.

Anil Jadhao 

Pune News: उत्तर भारतातील काही भागात थंडी कमी जास्त होत आहे. तर राज्यातील तापमानात चढ उतार सुरुच आहेत. राज्यात आजही थंडी कमीच होती. तर दुपारी उन्हाचा चटकाही अनेक भागात जाणवत आहे.  राज्यातील तापमानातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

उत्तर भारतात थंडी कमी जास्त होत आहे. उत्तर भारतातील काही भागात आजही थंडी वाढली होती. तर काही भागात थंडी कमीच होती. उत्तर भारतातील अनेक भागात धुक्याची चादरही पाहायला मिळत आहे.

आज राजस्थानातील फतेहपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  एकामागोमाग येणाऱ्या पश्चिमी चक्रवातांबरोबरच वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १४५ नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत.

राज्यात सध्या सकाळी गारठा आणि धुके तसेच दुपारी उन्हाचा चटका अशी परिस्थिती जाणवत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उकाडाही जाणवत आहे. आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

राज्यात तापमानात वाढलेलेच आहे. आजपासून राज्यात आकाश अंशतः ढगाळ होण्याची व किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT