Weather Update Agrowon
हवामान

Rain Update : राज्यातील विविध भागात वाढतोय उन्हाचा चटका! राज्यात शुक्रवारपासून पावसाची शक्यता?

Weather Update : राज्यात दुपारी उन्हाचा चटका काहीसा वाढू लागला आहे. सकाळचा गारठाही कमी झाला आहे. राज्यात शुक्रवारीपासून काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Dhananjay Sanap

Weather Forecast : राज्यात दुपारी उन्हाचा चटका काहीसा वाढू लागला आहे. सकाळचा गारठाही कमी झाला आहे. राज्यात शुक्रवारीपासून काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाला पोषक स्थिती तयार होत असल्याचं हवामान विभागाने जाहीर केलं आहे.

आज मराठवाडा मध्य महाराष्ट्र, कोकण गोव्यात उन्हाचा चटका काहीसा वाढला होता. तर मागील चोवीस तासात जळगाव येथे १४.५ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली.

उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, चंडीगढ, उत्तराखंडचा मैदानी प्रदेश, उत्तर राजस्थानमध्ये सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली तर दिल्ली उर्वरित राजस्थान, उत्तरप्रदेश आणि उत्तर मध्यमध्यप्रदेशमध्ये कमाल तापमानात काहीशी वाढ झाली.

सर्वात कमी ४.२ सेल्सियस अंश तापमानाची नोंद हरियाणातील कर्नाल येथे झाली. हिमालच आणि पंजाबमध्ये तुरळक ठिकाणी थंडीच्या लाटेची शक्यता आहे.

मंगळवारी आणि बुधवारी अरुणाचलप्रदेशच्या काही भागात तर हिमालय आणि पश्चिम बंगाल, सिक्कीम आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरा हलक्या पावसाची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या पावसाच्या सरीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: राज्यात ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढणार

DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर डीसीसी बँकेच्या संचालक निवडीसाठी आज मतदान

Farm Loan Waiver: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १.८० लाख शेतकरी कर्जमुक्तीस पात्र

Ram Temple Funds Issue: राम मंदिराचा पैसा खासदार फोडण्यासाठी; उद्धव ठाकरेंचा भाजपवर आरोप

Agriculture Education: कृषी क्षेत्रात आहेत करिअरच्या संधी...

SCROLL FOR NEXT