Weather Update Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा चटका वाढतोय

Maharashtra Weather News : कमाल तापमान पुन्हा पस्तिशीपार

Team Agrowon

Maharashtra Climate : राज्यात कमाल तापमानात पुन्हा वाढ होऊ लागल्याने उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहे. किमान तापमानाचा पारा वाढू लागल्याने गारठा कमी अधिक होत आहे. आज (ता. ७) राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यानंतर राज्याच्या किमान तापमानात अचानक घट झाल्याने निफाड येथे पारा ७ अंशांच्या खाली घसरला होता. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका, उकाडा कायम असल्याचे चित्र आहे.

बुधवारी (ता. ६) किमान तापमानात वाढ होत पारा पुन्हा वर सरकला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ९.८ अंश तापमानाची नोंद झाली. बुधवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३८.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अनेक ठिकाणी कमाल तापमान ३५ अंशांच्या पार आहे.

पूर्व विदर्भापासून कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. विदर्भ, मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामान असून, आज (ता.७) तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३५.८ (१४.४), धुळे ३४ (११), जळगाव ३५.२ (१२.८), कोल्हापूर ३४.६ (१९.७), महाबळेश्वर ३० (१६.४), मालेगाव ३२.४ (३२.४), नाशिक ३४.५ (१२.६), निफाड ३३ (९.८), सांगली ३५.९ (२०.१), सातारा ३५.३ (१७), सोलापूर ३८.२ (२१.८), सांताक्रूझ ३३.३ (१७.८), डहाणू ३२.१ (१५.५), रत्नागिरी ३४ (१८.३), छत्रपती संभाजीनगर ३४ (१६.६), नांदेड ३५.८ (२०.४), परभणी ३६.१ (१९.५), अकोला ३६.३ (१८), अमरावती ३४.८ (१९.८), बुलडाणा ३४.४ (१७.४), ब्रह्मपुरी ३६.६ (१९.८) चंद्रपूर ३६.६ (१९.८), गडचिरोली ३३.४ (१८), गोंदिया ३३.२ (१८.२), नागपूर ३४.२ (१८.८), वर्धा ३५.९ (२१), वाशीम ३७.४ (१६.८), यवतमाळ ३७ (२०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीपोटी १६४ कोटी मदत मंजूर

Summer Moong Sowing: खानदेशात उन्हाळ मूग पेरणीला प्रतिसाद

Sugar Export Ban: साखर निर्यात बंदी म्‍हणजे शेतकऱ्यांची लूट : अशोकराव थोरात

Swachhta Hi Seva Campaign: ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा ५०० वा टप्पा साजरा

Villages Flood Risk: अहिल्यानगर जिल्ह्यातील २२३ गावे पुराच्या धोक्यात

SCROLL FOR NEXT