Fengal Cyclone Agrowon
हवामान

Fengal Cyclone : `फेंगल` चक्रीवादळ उद्या किनाऱ्याला धडकणार; `फेंगल` चक्रीवादळाचा फटका कोणत्या राज्याला बसणार? महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला

Cyclone Update : पुढच्या ६ तासांमध्ये नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीचे रुपांतर `फेंगल` चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. उद्या दुपारपर्यंत उत्तर तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीला कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.

Anil Jadhao 

Pune News : पुढच्या ६ तासांमध्ये नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीचे रुपांतर `फेंगल` चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. उद्या दुपारपर्यंत हे चक्रीवादळ उत्तर तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीला कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. तर राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून जेऊर येथे हंगामातील निचांकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीची तीव्रता वाढत आहे. आज ही प्रणाली पुदुच्चेरीपासून ३४० किलोमीटर तर चेन्नईपासून ३८० किलोमीटर आग्नेयेकडे होती. ही वादळी प्रणाली वायव्येकडे वाटचाल करण्याची शक्यता असून पुढच्या ६ तासांमध्ये या वादळी प्रणालीचे रुपांतर `फेंगल` चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. 

त्यानंतर या चक्रीवादळाची वाटचाल वायव्य दिशेने कायम राहून उद्या दुपारपर्यंत उत्तर तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनाऱ्यावर कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान येण्याची शक्यता आहे. यावेळी ७० ते ८० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. चक्रीवादळामुळे तमिळनाडूत अनेक जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला. 

उत्तर तमिळनाडू आणि रायलसिमा भागात काही ठिकाणी आज आणि उद्या अतिजोरदार ते जोरदार पावसाचा अंदाज दिला. आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारी भागात आणि यनाम भागात उद्या जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच १ डिसेंबरला तमिळनाडूच्या अंतर्गत भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. 

उत्तर भारत आणि महाराष्ट्रातील थंडीचा कडाका कायम आहे. आज महाराष्ट्रात आणि देशात हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. पंजाबमधील अदापूर आणि महाराष्ट्रातील जेऊर येथे निचांकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. तसेच परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि धुळे येथील कृषी महाविद्यालयात ८ अंश सेल्सिअस तापमान होते. तर राज्यातील काही ठिकाणी १० अंशाच्या दरम्यान तापमानाची नोंद झाली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

Maharashtra Drought Crisis: होरपळीच्या सुलतानी झळा

Onion Procurement Irregularities: ‘खरे’ उत्तर मिळेल?

Water Shortage Management: पुणे जिल्ह्यात टंचाईमुळे पाणी नियोजनाला वेग

SCROLL FOR NEXT