Climate Change Agrowon
हवामान

Super El Nino : उन्हाळ्यात जाणवणार ‘सूपर एल-निनो’चा प्रभाव

Super El Nino What will be the Effect on India : दक्षिण अमेरिकेजवळील प्रशांत महासागरातील उष्ण पाण्यामुळे जगातील हवामानावर तीव्र परिणाम दिसून येतात. यामुळे जगभरात अन्न उत्पादन, पाण्याची उपलब्धतेबरोबरच मानव आणि परिसंस्था या दोघांच्याही आरोग्यावर दूरगामी परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.

अमोल कुटे

Pune News : विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील ‘एल-निनो’ स्थितीची तीव्रता वाढत आहे. आगामी उन्हाळ्यात (मार्च ते मे) एल-निनो आतापर्यंतच्या सर्वाधिक तीव्र स्थितीत पोचण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील नॅशनल ओशनिक अॅण्ड अॅटमोस्फेरिक एडमिनिस्टेशन (नोआ) या संस्थेने उत्तर गोलार्धात ‘सुपर एल-निनो’चा प्रभाव दिसून येण्याचे संकेत दिले आहेत. सुपर एल-निनोमुळे भारतातील मॉन्सूनवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

दक्षिण अमेरिकेजवळील प्रशांत महासागरातील उष्ण पाण्यामुळे जगातील हवामानावर तीव्र परिणाम दिसून येतात. यामुळे जगभरात अन्न उत्पादन, पाण्याची उपलब्धतेबरोबरच मानव आणि परिसंस्था या दोघांच्याही आरोग्यावर दूरगामी परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.

पुढील वर्षी विषुववृत्तीय समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा किमान १.५ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. तर तीव्र ‘एल-निनो’ स्थितीची शक्यता ७५ ते ८० टक्क्यांच्या दरम्यान आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यातच समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान २ अंशांपेक्षा जास्त वाढण्याची आणि ‘एल-निनो’ आतापर्यंतच्या तीव्र पातळीवर पोचण्याची शक्यता ३० टक्के आहे. १९९७-९८ तसेच २०१५-१६ मध्ये जगभरात वाढलेले तापमान, दुष्काळ आणि पूर या आपत्तींना तोंड द्यावे लागले होते.

तीव्र ‘एल-निनो’ मुळे उत्तर अमेरिकेत सामान्यत: कोरड्या आणि सरासरीपेक्षा उष्ण हवामान, तर दक्षिण अमेरिकेच्या काही भागांमध्ये जास्त पाऊस आणि हिवाळ्यात सरासरीपेक्षा काहीसे कमी तापमान अनुभवायला मिळते. ‘एल-निनो’ मुळे भारतात नैॡत्य मॉन्सून वाऱ्यांचे प्रवाह कमकुवत राहून, कोरडे हवामान राहून मॉन्सून हंगामात पाऊस कमी होऊ शकतो.

भारतावर काय परिणाम होणार?

संभाव्य सुपर ‘एल-निनो’ स्थितीमुळे भारतातील हवामान प्रणालींमध्ये अडथळे येऊ शकतात. परिणामी अत्यंत तीव्र हवामान घटना घडून, काही भागात मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती निर्माण होऊ शकते.

तर काही भागात मोठे खंड पडून पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते. उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिणेकडे ‘एल-निनो’चा प्रभाव कमी असल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंतच्या निम्म्या ‘एल-निनो’ वर्षांमध्ये भारतात मॉन्सूनचा पाऊस ९० टक्क्यांपेक्षा कमी होऊन दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT