Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather : थंडीची चाहूल, गारठा वाढतोय

Weather Update : कोकण वगळता राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमानाचा पारा वेगाने खाली यायला सुरुवात झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पारा १७ अंशांच्या खाली आला आहे.

अमोल कुटे

Pune News : कोकण वगळता राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमानाचा पारा वेगाने खाली यायला सुरुवात झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पारा १७ अंशांच्या खाली आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान ११ अंशांपर्यंत घसरल्याने थंडीची चाहूल लागली आहे. यातच दक्षिणेकडील जिल्ह्यात आज (ता. १४) ढगाळ हवामानासह विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळले आहे. या भागात समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

राज्याच्या कमाल तापमानात हळूहळू घट होत असून, कोकणात कमाल तापमान अद्यापही ३५ अंशांच्या पुढे आहे. बुधवारी (ता. १३) डहाणू येथे राज्यातील उच्चांकी ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा सातत्याने घसरत असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. बुधवारी (ता. १३) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ११.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही किमान तापमान १५ अंश आणि त्यापेक्षा खाली आले आहे.

आज (ता. १४) उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहणार असून, दक्षिणेकडे असलेल्या जिल्ह्यात ढगाळ हवामान होत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तसेच रायगड, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. १२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.४ (१४.६), अहिल्यानगर ३० (१५.३), धुळे (१२.०), जळगाव ३२.४ (१५.४), कोल्हापूर ३०.६ (१९.५), महाबळेश्‍वर २५.३ (१५), मालेगाव २९.४ (१५.८), नाशिक ३०.१ (१३.४), निफाड २९.९ (११.८), सांगली ३१.८ (१८.६), सातारा ३०.५ (१६.५),

सोलापूर ३४.८ (२०.६), सांताक्रूझ ३५.१ (२०.४), डहाणू ३५.८ (१९.४), रत्नागिरी ३५.२ (२२.२), छत्रपती संभाजीनगर ३१ (१५), धाराशिव ३१ (१९.४), परभणी ३१.४ (१६.१), परभणी कृषी विद्यापीठ ३१.५ (१४.१), अकोला ३३.३ (१७.६), अमरावती ३२.४ (१६.७), बुलडाणा ३१ (१६.८), ब्रह्मपुरी ३३.८ (१६.८), चंद्रपूर ३१.८ (१६.२), गडचिरोली ३२ (१६), गोंदिया ३१.४ (१६.२), नागपूर ३२.१ (१६.२), वर्धा ३२.१ (१६), वाशीम ३४.६, यवतमाळ ३१.२ (१५).

१५ अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे : निफाड ११.८, धुळे १२, नाशिक १३.४, परभणी (कृषी महाविद्यालय) १४.१, पुणे १४.६, महाबळेश्‍वर १५, छत्रपती संभाजीनगर १५, यवतमाळ १५.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर.

विजांसह पावसाची शक्यता : रायगड, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT