Cold Weather Agrowon
हवामान

Maharashtra Cold : थंडीचा कडाका वाढला; राज्याच्या बहुतांशी भागात किमान तापमानात घट

Weather Update : राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम ऱाहू शकते,असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागात थंडी वाढली आहे. सकाळी गारठा वाढला आहे. तर उत्तर भारतातील अनेक भागात थंडीची लाट कायम आहे. राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम ऱाहू शकते,असा अंदाज हवामान विभागाने दिला.

राज्यातील बहुतांशी भागात आज थंडीचा कडाका वाढला होता. अनेक भागात किमान तापमानात घट झाल्याचे दिसते. कमाल तापमानातही घटीची नोंद झाली. राज्यातील किमान तापमान पुढील काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज आहे.

तर काही भागात किमान तापमानातील घट आणखी जाणवू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला. उत्तर भरतातील बहुतांशी भागात थंडीची लाट कायम आहे. पंजाबच्या बहुतांशी भागात तर हरियाना आणि पंजाबच्या काही भागात किमान तापमान २ ते ५ अंशाच्या दरम्यान होते.

तसेच दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश, बिहार, झारखंड आणि उत्तर छत्तीसगडच्या बहुतांशी भागात किमान तापमान ६ ते १० अंशाच्या दरम्यान राहील्याच्या नोंदी हवामान विभागाच्या आहेत. पंजाबमधील अमृतसर येथे देशातील सर्वात निचांकी २ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT