Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather : तापमानात चढ उतार राहणार; राज्यातील पावसाचे वातावरण निवळले; थंडीला सुरुवात होण्याची शक्यता

Weather Forecast : राज्यात पावसाचे वातावरण दूर झाले. त्यामुळे तापमानात चढ उतार दिसून येत आहेत. गेल्या आठवडाभरात ढगाळ वातावरण आणि पावसामुळे थंडी गायब झाली होती.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात पावसाचे वातावरण दूर झाले. त्यामुळे तापमानात चढ उतार दिसून येत आहेत. गेल्या आठवडाभरात ढगाळ वातावरण आणि पावसामुळे थंडी गायब झाली होती. उत्तर भारतातील राज्यांमध्येही बहुतांशी ठिकाणी थंडी कमी झाली. राज्यात पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा थंडीला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या परिसरापासून उत्तर गुजरातपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्ट्याचीही निर्मिती झाली. पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे आग्नेय अरबी समुद्रापासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे सध्या उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडी कमी झालेली आहे.

राज्यात मागील आठवडाभरात राज्यात ढगाळ हवामानासह पावसानेदेखील हजेरी लावली. मागील तीन दिवसांमध्ये राज्याच्या काही भागात गारपीटही झाली होती. तर पावसाने देखील पिकांना तडाखा दिला होता.

त्यामुळे राज्यातील थंडी गायब झाली आहे. उत्तर भारतातूनही थंडी वाऱ्यांचा प्रवाह काहीसा खंडीत झाला होता. राज्यात आजही तापमानात चढ उतार राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच पुढील काही दिवसांत पुन्हा थंडीला सुरुवात होऊ शकते, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सरी शक्य; उन्हाचा चटका कायम

Ratoon Sugarcane: खोडवा उसावरील एल निनोच्या उष्णतेचा ताण कसा कमी करावा?

Farmers Protest: शेतकरी अडचणीत, ऊस दर, धान खरेदी प्रश्नी राकेश टिकेत आक्रमक, मोठ्या आंदोलनाचा इशारा

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT