Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather: महाराष्ट्रातील तापमानाचा पारा चढला; पुढील दिवसांत आणखी वाढ होईल!

Weather Forecast Maharashtra: महाराष्ट्रात तापमानाचा पारा चढला असून, राज्यातील बहुतांशी भागात तापमान वाढण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये आज ३७.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, हवामान विभागाच्या अंदाजानुसार उकाड्याचा प्रकोप अधिक वाढणार आहे.

Anil Jadhao 

Pune News: देशातील तापमानातील चढ उतार कायम आहेत. राज्यात उन्हाच्या झळाही वाढल्या आहेत. काही ठिकाणी तापमानाचा पारा ३६ अंशांच्याही पुढे पोचला. आज सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

उत्तर भारतातही तापमानात काहीशी वाढ झाली आहे. आज पंजाबमधील पठाणकोट येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तर वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत ११० ते १२० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह वाहत आहेत. उत्तर भरतातील तापमानावर या घडामोडींचा परिणाम दिसून येत आहे. 

राज्याच्या कमाल तापमानात वाढ होत आहे. आज सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूरमध्ये ३७.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर सांगली येथे ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

जेऊर आणि परभणी येथे ३७ अंश सेल्सिअस तापमान होते. त सातारा, छत्रपती संभाजीनगर येथे कमाल तापमान ३६ अंशांवर होते. उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या असून, उकाड्यामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. राज्यातील तापमानातील वाढ कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT