Cold Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : विदर्भात पारा आणखी घसरण्याची शक्यता

Cold Weather : राज्यात ढगाळ हवामान असल्याने कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार सुरू आहेत.

अमोल कुटे

Pune News : राज्यात ढगाळ हवामान असल्याने कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार सुरू आहेत. पहाटेच्या वेळी काही प्रमाणात धुके आणि दव पडल्याचे दिसून येत आहे. आज (ता. ११) विदर्भात किमान तापमानात घट होत असून, पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

रविवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात बुहतांश ठिकाणी कमाल तापमान २२ ते ३० अंशांच्या दरम्यान होते.

किमान तापमानात चढ-उतार होत असून, जोरदार थंडीची प्रतीक्षा आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात येथे राज्यातील नीचांकी १२.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

रविवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३० (१५.३), जळगाव - (१५.९), कोल्हापूर ३०.५ (१९.६), महाबळेश्‍वर २५.८ (१४.७), नाशिक २९ (१५.३), निफाड २८.८ (१२.६), सांगली ३०.४ (१९.३), सातारा ३०.७ (१७.५), सोलापूर ३३ (१८.६), सांताक्रूझ ३३.२ (२१.३), डहाणू ३०.९ (२०.१), रत्नागिरी ३४.८ (२३),

छत्रपती संभाजीनगर २८.४ (१५.४), नांदेड २९.८ (१५.८), परभणी - (१५.९), अकोला ३०.३ (१६.१), अमरावती २८.४ (१५.३), बुलडाणा २७ (१४.२), ब्रह्मपुरी ३०.१ (१५.०), चंद्रपूर २८.४ (१३.६), गडचिरोली २९ (१६), गोंदिया २७.५ (१२.६), नागपूर २८ (१२.९), वर्धा २७.६ (१४.४), वाशीम २८.२ (१६.२), यवतमाळ २९.२ (१३.७).

थंडी हळूहळू वाढत जाणार

आग्नेय अरबी समुद्रात मालदीव बेटांजवळ समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. राज्यात काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान दिसून येत आहे.

पहाटे गारठा तर दुपारी चटका आणि उकाडा अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे. तर कमी-अधिक प्रमाणात धुक्यासह दव पडल्याचे चित्र कायम आहे. यातच राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता असल्याने थंडी हळूहळू वाढत जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT