Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : राज्यातील तापमान ३४ अंशांपुढे

Latest Weather Update : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव वाढला आहे. शुक्रवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे सर्वाधिक ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Team Agrowon

Pune News : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव वाढला आहे. शुक्रवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे सर्वाधिक ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तापमान ३४ अंशांच्या पुढे राहिले. आज (ता. ७) राज्यात मुख्यतः कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.

अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, परभणी आणि सोलापूर येथे तापमान ३५ अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. आज (ता. ७) राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडिपीसह कोरड्या व उष्ण हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पश्‍चिम बंगाल आणि बांगलादेश परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. नागालँडपासून नैर्ऋत्य बिहारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :

अकोला ३५.५, सोलापूर ३५.२, परभणी ३५.१, ब्रह्मपुरी ३५, चंद्रपूर ३५.

शुक्रवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.४, जळगाव ३३.६, कोल्हापूर ३१.२, महाबळेश्‍वर २६.१, नाशिक ३०.८, सांगली ३२.४, सातारा ३२.६, सोलापूर ३५.२, सांताक्रूझ ३२.६, डहाणू ३३, रत्नागिरी ३१.४, छत्रपती संभाजीनगर ३३, नांदेड ३४.२, परभणी ३५.१, अकोला ३५.५, अमरावती ३४, बुलडाणा ३२.७, ब्रह्मपुरी ३५, चंद्रपूर ३५, गडचिरोली ३४, गोंदिया ३३.४, नागपूर ३४.९, वर्धा ३४.९, वाशीम ३३, यवतमाळ ३३.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT