Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather : तापमानात चढ उतार राहणार; राज्यातील थंडी कमीच, दुपारी उष्णता वाढल्याने उकाडाही जाणवतोय

Maharashtra Weather Forecast : राज्यातील बहुतांशी भागात वाढलेले तापमान कायम आहे. थंडी अद्यापही गायब असल्याने अनेक ठिकाणी दुपारी उकाडा जाणवत आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील बहुतांशी भागात वाढलेले तापमान कायम आहे. थंडी अद्यापही गायब असल्याने अनेक ठिकाणी दुपारी उकाडा जाणवत आहे. राज्यात पहाटे धुके पडत असून, किमान तापमानात हळूहळू घट होत आहे. राज्यातील तापमानात चढ उतार राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

उत्तरेकडील राज्यांमध्येही थंडी कमी जास्त होत आहे. डिसेंबर महिन्यात उत्तरेकडून येणारे थंड वाऱ्याचे प्रवाह मागील दोन आठवड्यांपासून खंडीत होण्याला सुरु झाली होती. अद्यापही प्रवाह खंडीत झालेले आहेत.

त्यामुळे राज्यात थंडी कमी आहे. आज बिहारमधील डेहरी येथे देशातील सर्वात कमी ४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. राज्यातही थंडी कमी झालेी आहे. तर काही ठिकाणी धुके आणि दव पडत आहे. सकाळी हवेतील गारवा काही प्रमाणात वाढलेला दिसत असला तरी दुपारी उन्हाचा चटका कायम दिसत आहे.

काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरणही होते. आज जळगाव येथे १२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर ठाणे येथे सर्वाधिक ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage: एका दिवसात ८४६८ हेक्टरला फटका

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगरमध्ये पूर्वमोसमी पावसाचा पिकांना फटका

Food Processing License: अन्नप्रक्रिया परवाना नूतनीकरणाची अट रद्द

Revenue Department: शासकीय तिजोरीत ६१ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा

Lemon Price Drop: ऐन उन्हाळ्यात लिंबांच्या दरात घसरण

SCROLL FOR NEXT