Weather Map Agrowon
हवामान

Maharashtra Weather : अंशतः ढगाळ हवामानासह तापमानात चढ - उतार शक्य

Cloudy Weather Forecast : राज्यात थंडी ओसरल्यानंतर पावसाला पोषक हवामान होत आहे. रविवारी (ता. २२) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी ९ अंश तापमान नोंदले गेले.

अमोल कुटे

Pune News : राज्यात थंडी ओसरल्यानंतर पावसाला पोषक हवामान होत आहे. रविवारी (ता. २२) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी ९ अंश तापमान नोंदले गेले. आज (ता. २३) अंशतः ढगाळ हवामानासह, राज्याच्या किमान तापमानातील चढ - उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली उद्यापर्यंत (ता. २४) ही प्रणाली उत्तर तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी - अधिक होत आहे. रविवारी (ता. २२) पंजाबच्या ‘लुधियाना’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने राज्यात थंडीची लाट ओसरली आहे. धुळे वगळता उर्वरित राज्यात किमान तापमान १० अंशांच्या वर गेले आहे. पहाटेच्या वेळी धुक्याची चादर आणि दव पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

यातच रविवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.३ अंश तापमानाची नोंद झाली. राज्याच्या काही भागात अंशतः ढगाळ हवामान दिसून येत असून, महिनाअखेर पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे. राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तविला आहे.

रविवारी (ता. २२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.४ (१५.२), अहिल्यानगर ३०, धुळे २९.५ (९), जळगाव ३० (१५), कोल्हापूर २९.५ (१७.४), महाबळेश्वर २४.६ (१४.२), मालेगाव २७.८ (२०), नाशिक २९.३ (१४.०), निफाड २७.७ (११.६), सांगली २९.७ (१६.९), सातारा ३१.१ (१५), सोलापूर ३३.३ (२०.४), सांताक्रूझ २९.८ (२०.०), डहाणू २७.१ (१८.४), रत्नागिरी ३०.० (१९.७),

छत्रपती संभाजीनगर २९.४ (१५), धाराशिव ३०.२ (१६.४), परभणी ३० (१६.५), परभणी कृषी विद्यापीठ २९.७ (१४.५), अकोला ३१.९ (१५.५), अमरावती ३१.४ (१५.४), भंडारा २९.४ (१५), बुलडाणा २९.८ (१५.८), ब्रह्मपुरी ३१.७ (१४.८), चंद्रपूर ३०.२, गडचिरोली ३०.६ (१५.२), गोंदिया २८.२ (१३.३), नागपूर ३०.४ (११.८), वर्धा ३० (१३.९), वाशीम (१६.८), यवतमाळ ३०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT