Weather  Agrowon
हवामान

Maharashtra Hawaman Update : तापमानात चढ उतार होण्याची शक्यता; राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानातील घट कायम

Maharashtra Weather Update : उत्तरेकडील थंडी वाऱ्यांनी महाराष्ट्रात थंडीची लाट टिकून आहे. अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली आला. घसरल्याने हुडहुडी कायम आहे.

Anil Jadhao 

Pune News : उत्तरेकडील थंडी वाऱ्यांनी महाराष्ट्रात थंडीची लाट टिकून आहे. अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली आला. घसरल्याने हुडहुडी कायम आहे. आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी ५ अंश तापमान नोंद झाली होती. राज्यात तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

लक्षद्वीप आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती विरून गेली आहे. नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र सक्रिय असून, ही प्रणाली तमिळनाडूच्या किनाऱ्याकडे येताना ही प्रणाली आणखी तीव्र होणार आहे.

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम असल्याने राजस्थानमधील चूरु येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यातही अनेक भागात किमान तापमानातील घट कायम आहे. जेऊर येथे आज ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मोहोळ येथे ६.९ अंश सेल्सिअस तापमान होते. तसेच नगर, जळगाव, नांदेड, नाशिक, धाराशिव, सातारा, उदगीर, तुळगा येथे किमान तापमान हे १० अंशांपेक्षाही कमी होते. तसेच राज्यातील तापमानात पुढील दोन दिवसांमध्ये चढ उतार दिसतील, असाही अंदाज हवामान विभागान दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Financial Crisis: दुष्काळात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

Onion Storage Loss: साठवणुकीत ३७ टक्के कांद्याचे नुकसान

MLA Pension Rule: आमदारांच्या निवृत्ती वेतनाला आव्हान; उच्च न्यायालयाची प्रकरणावर सुनावणीस मान्यता

Urea Subsidy Formula: युरिया अनुदानाचे सूत्र बदलण्याची शिफारस

October Heat: ‘ऑक्टोबर हीट’ ठरतेय तापदायक

SCROLL FOR NEXT