Rain Forecast Agrowon
हवामान

Rain Alert: तापमानात घट; पूर्व विदर्भात पावसाचा इशारा

Weather Update: पूर्व विदर्भातील हवामानात अचानक बदल होतो आहे. तापमान घसरत असून, हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. शेतकरी आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News: उन्हाच्या झळांनी होरपळत असलेल्या महाराष्ट्राला काहीसा दिलासा मिळाला आहे. विदर्भासह राज्याच्या कमाल तापमानात लक्षणीय घट दिसून आली आहे. आज (ता. २९) पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. त्यापासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. तर पश्चिम विदर्भापासून मराठवाडा, कर्नाटक ते उत्तर केरळपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. राज्यात उन्हाचा चटका कमी झाला असला तरी उकाडा आणि घामाच्या धारा त्रासदायक ठरत आहे. तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान होत असून, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली.

सोमवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ‎मालेगाव, ‎परभणी, अकोला आणि वाशीम येथे राज्यतील उच्चांकी ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगाव येथे ४२ अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. ‎‎धुळे, ‎निफाड, ‎छत्रपती संभाजीनगर, ‎धाराशिव, ‎अमरावती व ‎ब्रह्मपुरी येथे ४१ अंशांपेक्षा अधिक, अहिल्यानगर, ‎जेऊर, ‎सोलापूर, भंडारा व ‎बुलडाणा येथे ४० अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. राज्याच्या कमाल तापमानात १ ते ६ अंशांची लक्षणीय घट झाली आहे.

‎आज (ता. २९) परभणी, हिंगोली आणि नांदेड येथे उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे. ‎तसेच यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाश आणि कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवारी (ता. २८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---३९.४---२१.६

अहिल्यानगर---४०.८---२३.३

‎‎धुळे---४१.५---१९.२

‎जळगाव---४२.३---२६.०

‎जेऊर---४०.५---२२.५

‎कोल्हापूर---३७.१---२३.३

‎महाबळेश्वर---३३.६---१९.१

‎मालेगाव---४२.४---२६.०

‎नाशिक---३९.८---२१.७

‎निफाड---४१.३---१९.७

‎सांगली---३८.४---२३.०

‎सातारा---३९.७---२२.५

‎सोलापूर---४०.०---२४.६

‎सांताक्रूझ---३३.८---२६.८

‎डहाणू---३६.२---२५.५

‎रत्नागिरी---३३.६---२५.६

‎छत्रपती संभाजीनगर---४१.७---२४.६

‎धाराशिव---४१.८---२२.०

‎परभणी---४२.४---२६.०

‎परभणी (कृषी)---३८.५---२४.३

‎अकोला---४२.४---२८.६

‎अमरावती---४१.२---२५.९

‎भंडारा---४०.०---२०.०

‎बुलडाणा---४०.२---२५.५

‎ब्रह्मपुरी---४१.०---२३.८

‎चंद्रपूर---३८.२---निरंक

‎गडचिरोली---३६.०---२३.०

‎गोंदिया---३७.४---१८.६

‎नागपूर---३९.२---२४.०

‎वर्धा---३९.९---२५.६

‎वाशीम---४२.४---निरंक

‎यवतमाळ---३८.८---२५.४

सरासरी तापमान (अंश से.)

‎विभाग---किमान---कमाल

‎विदर्भ---१८.६---४२.४

‎मराठवाडा---२२.०---४२.४

‎पश्चिम महाराष्ट्र---१९.१---४०.५

‎उत्तर महाराष्ट्र---१९.२---४२.४

‎कोकण---२५.५---३६.२

४२ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

‎मालेगाव ४२.४, ‎परभणी ४२.४, अकोला ४२.४, वाशीम ४२.४, जळगाव ४२.३.

‎उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

परभणी, हिंगोली, नांदेड.

वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Water Budgeting: समृद्ध गावशिवारासाठी पाण्याचा ताळेबंद

FPO Success Story: विविध उपक्रमांमधून ‘सातबारा’ कंपनीची आश्‍वासक वाटचाल

Post Harvest Management: काढणीपश्चात तंत्रज्ञानाची सद्यःस्थिती अन् आव्हाने

Spice Business Success: बीटेक पदवीधराचा ‘अष्टगुण मसाले’ ब्रॅंड

Mushrooms Health Benefits: पोषणमूल्ययुक्त आरोग्यदायी अळिंबी

SCROLL FOR NEXT