Cold Weather Agrowon
हवामान

Maharashtra Temperature: किमान तापमानात घट शक्य

Indian Meteorological Department: आजपासून (ता. ४) किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांच्या वर गेल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. आजपासून (ता. ४) किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर गुजरात आणि परिसरावर ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १३० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. सोमवारी (ता. ३) राजस्थानमधील गंगानगर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्याच्या अनेक भागात निरभ्र आकाश असून, काही ठिकाणी धुके आणि दव पडल्याचे चित्र कायम आहे. सोमवारी (ता. ३) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान ११ ते २० अंशांच्या दरम्यान आहे.

उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, कमाल तापमान ३६ अंशांच्या पार पोचले आहे. उकाडा वाढल्याने घामटा निघत आहे. सोमवारी (ता. ३) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर आणि वाशीम येथे ३६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जेऊर, अकोला, ब्रह्मपुरी, वर्धा आणि यवतमाळ येथे पारा ३५ अंशांपार आहे. आजपासून (ता. ४) किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सोमवारी (ता. ३) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३४.१---१६.०

अहिल्यानगर---३४.१---१५.५

धुळे---३१.०---१०.५

जळगाव---३२.०---१८.०

जेऊर---३५.५---१५.५

कोल्हापूर---३३.४---१९.१

महाबळेश्वर---२९.५---१७.०

मालेगाव---३१.२---१४.८

नाशिक---३३.३---१४.९

निफाड---३०.८---१२.६

सांगली---३४.४---१७.९

सातारा---३४.३---१६.६

सोलापूर---३६.४---१८.६

सांताक्रूझ---३१.४---१६.६

डहाणू---२९.२---१८.४

रत्नागिरी---३२.८---१९.१

छत्रपती संभाजीनगर---३३.२---१७.५

धाराशिव---३३.५---१६.०

परभणी---३४.६---१७.७

परभणी (कृषी)---३३.६---१२.५

अकोला---३५.४---१८.०

अमरावती---३४.६---१७.९

भंडारा---३३.६---१८.०

बुलडाणा---३४.०---१८.६

ब्रह्मपुरी---३६.२---१८.०

चंद्रपूर---३४.६---निरंक

गडचिरोली---३३.४---१८.०

गोंदिया---३३.६---१९.८

नागपूर---३४.६---१७.९

वर्धा---३५.०---१८.५

वाशीम---३६.४---२०.६

यवतमाळ---३५.०---१७.६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT