Heat Wave Agrowon
हवामान

Summer Heat Wave : उष्णतेच्या लाटांंनी फोडला घाम

पालघर जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा फैलाव होत असतानाच दुसरीकडे उष्णतेच्या लाटांनी सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. गुरुवारी जिल्ह्यात ३८ अंशावर पारा गेला आहे.

Team Agrowon

Palghar News : पालघर जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा फैलाव होत असतानाच दुसरीकडे उष्णतेच्या लाटांनी सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. गुरुवारी जिल्ह्यात ३८ अंशावर पारा गेला आहे.

त्यामुळे आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली असून नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभाग, जिल्हा आरोग्य व वसई विरार महापालिकेडून उष्णतेशी लढा देण्यासाठी उपाययोजनांची यादीदेखील जाहीर केली आहे.

पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता उष्णतेची लाट आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली असून पाऱ्याने जवळपास चाळिशी गाठली आहे.

गुरुवारी करण्यात आलेल्या नोंदीनुसार, पालघर जिल्ह्यात ३८ अंश इतके तापमान होते. उष्णतेचा मारा दुपारी अधिक जाणवत आहे. यामुळे डोळे, चेहरा यासह हातांना चटके लागत आहेत.

ग्रामीण, दुर्गम भागात शाळांसाठी लांबचा प्रवास विद्यार्थी वर्गाला करावा लागतो, त्यातच पारा अधिक असल्याने उन्हाचा सामना करत विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत उन्हाची झळ अधिक जास्त प्रमाणात असल्याने प्रवास करणे टाळले जात आहे.

उष्णतेचा त्रास झाल्यास अशी करा मदत

- संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी किंवा सावलीमध्ये तातडीने हलवण्‍यात यावे.

- शरीराच्या जास्तीत जास्त भागावर किंवा कपड्यांवर थंड पाण्याचा मारा करावा.

- शक्य असेल तेवढा वेळ बेशुद्ध व्यक्तीला वारा घालावा, औषधोपचार करावेत.

पशुपक्ष्यांना आधार द्या

मुक्या प्राण्यांना या उष्णतेचा फटका बसत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी छावणी उभारून पाण्याची व्यवस्था करावी. यामुळे मुक्या प्राण्यांचे उन्हापासून रक्षण होणार आहे. तसेच पक्ष्यांना खिडकी, उद्याने, सार्वजनिक ठिकाणी पाणी ठेवण्याचे तसेच वृक्षांना पाणी घालावे, असे आवाहनदेखील पर्यावरणप्रेमी करत आहेत.

तापमान जास्त असेल, तर नागरिकांना स्वतःची काळजी घ्यावी. जर शरीरावर काही परिणाम जाणवला, तर त्वरित वैद्यकीय मदत त्वरित मिळाली पाहिजे. याबाबत आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.
गोविंद बोडके, जिल्हाधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Scheme: कर्जमुक्ती योजनेअंतर्गत १६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण

Crop Insurance Compensation: विमा भरपाईतून वगळलेल्या शेतकऱ्यांचा आक्रोश

National Values: स्वातंत्र्य म्हणजे मनात येईल ते करणे नव्हे!

Onion Pest Management: कांदा पिकातील कीड नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Jalyukt Shivar 2.0: जलसंधारणाच्या कामांना गती द्या; प्रत्येक कामाचे जिओटॅगिंग अनिवार्य : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

SCROLL FOR NEXT