Summer Heat Agrowon
हवामान

Summer Heat : राज्यात उन्हाचा चटका कायम

राज्यात अनेक ठिकाणी तापमान चाळीशीपार गेल्याने महाराष्ट्र तापला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत असतानाच, उन्हाचा चटका देखील कायम आहे.

Team Agrowon

Weather Update Pune राज्यात अनेक ठिकाणी तापमान (Temperature) चाळीशीपार गेल्याने महाराष्ट्र तापला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस (Rainfall) हजेरी लावत असतानाच, उन्हाचा चटका देखील कायम आहे.

आज (ता. २२) विदर्भात वादळी पावसाचा इशारा आहे. तर मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता (Rain Forecast) हवामान विभागाने (Weather Update) वर्तविली आहे.

राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. यातच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली आहे.

शुक्रवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

ब्रह्मपूरी येथे तापमान ४२.७ अंश तापमान नोंदले गेले. उर्वरीत राज्यात कमाल तापमान ३५ ते ४२ अंशांच्या दरम्यान आहे. उन्हाचा चटका असह्य होत असून, उकाडाही वाढला आहे.

उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, विदर्भापासून, तेलंगणा ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडीत वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

आज (ता. २२) विदर्भात वादळी पावसाचा इशारा आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३८.४ (१७.६), जळगाव ४१.७ (२१.५), कोल्हापूर ३७.१ (२३.५), महाबळेश्वर ३०.७ (१६.९), नाशिक ३६.६(१९.०),

निफाड ३७.६(१५.४), सांगली ३८.६ (२१.४), सातारा ३७.६ (-), सोलापूर ४१.१ (२५.२), सांताक्रूझ ३७.३ (२४.६), डहाणू ३४.९ (२३.४), रत्नागिरी ३३.० (२४.०),

छत्रपती संभाजीनगर ३८.८ (१९.२), नांदेड ३८.२ (-), परभणी ४०.० (२२.५), अकोला ४०.५ (२३.२), अमरावती ४१.४(२०.१), बुलढाणा ३७.४ (२१.४), ब्रह्मपूरी ४२.७ (२२.४),

चंद्रपूर ४२.८ (२२.८), गडचिरोली ४१.८(२२.२), गोंदिया ४१.५ (२३.४), नागपूर ३९.८ (२०.४), वर्धा ४१.४(२२.२), वाशीम ४०.८ (-), यवतमाळ ४१.२ (२९.५).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

विदर्भ : बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Potato Procurement: 'यूपी'त बाजार हस्तक्षेप योजनेतून २० लाख टन बटाट्याची खरेदी; 'आंध्र'साठी हरभरा खरेदीची मर्यादा वाढवली, केंद्राचा निर्णय

Pre Monsoon Rain Impact: पूर्वमोसमीच्या सावटामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती कायम

Fertilizer Shop License Suspension: नाशिक जिल्ह्यात १७ कृषिसेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Fertilizer Stock: जालना जिल्ह्यात १ लाख २९ हजार टन खतसाठा उपलब्ध

Custard Apple Processing: अंबाजोगाईत आता सीताफळावर प्रक्रिया

SCROLL FOR NEXT