Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्ण लाटेचा इशारा

Heat Wave : उन्हाची तीव्रता वाढल्याने राज्यात होरपळ वाढली आहे. वादळी पावसाने उघडीप दिली असून, उकाडा कायम आहे.

अमोल कुटे

Pune News : उन्हाची तीव्रता वाढल्याने राज्यात होरपळ वाढली आहे. वादळी पावसाने उघडीप दिली असून, उकाडा कायम आहे. आज (ता.२९) कोकणात उष्ण लाटेचा इशारा, तर विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.

पूर्व विदर्भापासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते उत्तर केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्याच्या विविध भागांत ढगाळ हवामान होत आहे. आज (ता. २९) विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे.

रविवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत वाशीम येथे राज्यातील उच्चांकी ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कमाल तापमानात वाढ झाल्याने चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नांदेड, मालेगाव, सोलापूर, गडचिरोली येथे पारा ४२ अंशांवर पोचला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान चाळिशी पार आहे. आज (ता. २९) मुंबईसह कोकणात उष्ण लाटेचा इशारा कायम आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका, उकाडा वाढण्याची शक्यता आहे.

रविवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३९.९, धुळे ४०.०, जळगाव ४१.५, कोल्हापूर ३८.७, महाबळेश्वर ३२.९, मालेगाव ४२.०, नाशिक ४०.१, निफाड ४०.०, सांगली ४०.५, सातारा ३९.१, सोलापूर ४२.०, सांताक्रूझ ३६.६, डहाणू ३४.६, रत्नागिरी ३४.७,

छत्रपती संभाजीनगर ३९.२, बीड ४१.२, नांदेड ४२.४, धाराशिव ४१.८, परभणी ४१.५, अकोला ४१.४, अमरावती ४०.०, बुलडाणा ३९.०, ब्रह्मपुरी ४२.७, चंद्रपूर ४२.८, गडचिरोली ४२.०, गोंदिया ३७.६, नागपूर ३९.७, वर्धा ४१.४, वाशीम ४३.०, यवतमाळ ४१.७.

-उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

- वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

अमरावती, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

४२ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

वाशीम ४३, चंद्रपूर ४२.८, ब्रह्मपुरी ४२.७, नांदेड ४२.४, मालेगाव ४२, सोलापूर ४२, गडचिरोली ४२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

VBG-Ram-ji: ग्रामीण रोजगाराच्या हमीची ऐशी-तैशी

Indian Political Challenges: राहुल गांधी आणि ‘सीजेपी’चे सरकारपुढे आव्हान

NHB Subsidy Cut: लेखाजोखा ‘एनएचबी’चा!

AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी

SCROLL FOR NEXT