Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पाऊस, गारपिटीची शक्यता

Hailstorm Forecast : आज (ता. १५) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा, तर जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा आहे.

अमोल कुटे

Pune News : पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी हजेरी लावल्याने राज्यात उन्हाचा काहीसा कमी झाला आहे. आज (ता. १५) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा, तर जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा आहे. कोकणात उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

मंगळवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुंबई, नगर, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. तुरळक ठिकाणी गारपिट झाली. ढगाळ आकाशामुळे उन्हाचा चटका कमी होत कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. जळगाव येथे उच्चांकी ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आग्नेय अरबी समुद्रात केरळजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण कर्नाटक परिसरावरील चक्राकार वाऱ्यांची स्थिती वरील कमी दाबाच्या पट्ट्यात विरून गेली आहे.

आज (ता. १५) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

मंगळवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३६.३, धुळे ४०.०, जळगाव ४१.६ कोल्हापूर ३५.६, महाबळेश्वर २९.१, मालेगाव ३७.२, नाशिक ३३.८, निफाड ३५.०, सांगली ३६.८, सातारा ३६.६, सोलापूर ३८.४, सांताक्रूझ ३४.८, डहाणू ३५.८, रत्नागिरी ३६.२,

छत्रपती संभाजीनगर ३८.२, बीड ३८.५, नांदेड ३७.८, धाराशिव ३७.०, परभणी ३८.४, अकोला ४१.५, अमरावती ३८.४, बुलढाणा ३७.६, ब्रह्मपूरी ३९.२, चंद्रपूर ३९.०, गडचिरोली ३७.६, गोंदिया ३८.८, नागपूर ३६.२, वर्धा ३७.५, वाशीम ४०.०, यवतमाळ ३८.०.

उष्ण लाटेचा पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

वादळी पाऊस गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) :

नाशिक, जळगाव, संभाजीनगर.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नंदूरबार, धुळे, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जालना, बीड, धाराशिव, वाशीम, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT