Weather Udpate Agrowon
हवामान

Weather News Maharashtra : राज्यात पुढील तीन-चार तासात वादळी पाऊस, गारपीटीचा इशारा

पुढील आठ दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून विविध जिल्ह्यात पावसाचा इशाराही हवामान विभागाने वर्तवला आहे.

Team Agrowon

Weather Update : राज्यातील विविध भागात पुढील तीन ते चार तासात तुरळक ठिकाणी वादळीवारे, वीजांसहित मध्यम ते हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, धाराशीव, बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

या जिल्ह्यांमध्ये ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर बीड आणि लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे.

आज सकाळपासून राज्यात ढगाळ आणि पावसाळी वातावरण होते. शुक्रवारी संध्याकाळी राज्यातील विविध जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपीटीने धुमाकूळ घातला. शेतकऱ्यांच्या पिकांवर गारांचे ढीग साचले होते.

पुढील आठ दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून विविध जिल्ह्यात पावसाचा इशाराही हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान, या पावसाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांसह आंबा, द्राक्ष, संत्री-मोसंबी या फळ बागांचे नुकसान झाले. तसेच आंब्याच्या कैऱ्या, संत्रा गळून पडले आहे. पेरू, टरबूज, खरबूज, टोमॅटोसह पालेभाज्या पिकांचे नुकसान झाले आहे.

ईशान्य अरबी समुद्रापासून राजस्थानपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंत हवेचा कूमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राजस्थान आणि उत्तर गुजरातमध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. या पोषक हवामान स्थितीमुळे राज्यात पाऊस सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: मक्यावर आवकेचा दबाव, मुळा दर टिकून, टोमॅटो दबावतच, बटाट्याला मागणीचा आधार तर पपई दर स्थिर

Paddy Crop Damage : पावसाचा भात पिकाला फटका

Banana Market : केळीची महिना-दीड महिना उधारीने विक्रीची वेळ

Agrowon Diwali Article: शेतीत रमलेला डॉक्टर

E-Peek Pahani : पीक पेरा नोंद होत नसल्याने अडचण

SCROLL FOR NEXT