Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Storm Alert : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Rainfall Alert : राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने ऐन हिवाळ्यात थंडी गायब झाली आहे. आज (ता. २६) उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने ऐन हिवाळ्यात थंडी गायब झाली आहे. आज (ता. २६) उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उद्या (ता. २७) राज्याच्या अनेक भागांत पावसाचा, तसेच गारपिटीचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

पश्‍चिम-मध्य बंगालच्या उपसागरात उत्तर तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. पश्‍चिमेकडे सरकत असलेली ही प्रणाली हळूहळू निवळण्याची शक्यता आहे. पश्‍चिमी चक्रावात, राजस्थान आणि परिसरावर असलेले चक्राकार वारे, तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे महाराष्ट्रासह उत्तर भारतात पावसाला पोषक हवामान झाले आहे.

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी - अधिक होत आहे. बुधवारी (ता. २५) पंजाबच्या आदमपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात ढगाळ हवामान झाले असून, गारठा कमी होत उकाडा वाढला आहे. बुधवारी (ता. २५) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी १३.४ अंश तापमान नोंदले गेले.

पावसाला पोषक हवामानामुळे राज्याच्या अनेक भागांत ढगाळ हवामान होत असून, पहाटेच्या वेळी धुक्याची दुलई पाहायला मिळत आहे. आज (ता. २६) राज्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

बुधवारी (ता. २५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे २८.८ (१६.४), अहिल्यानगर २७.८ (१५.४), धुळे २८ (१३.४), जळगाव २९.४ (१९.५), जेऊर ३२ (१५.५), कोल्हापूर २९.४ (१९.३), महाबळेश्‍वर २२.३ (१४.८), मालेगाव २६.८ (१६.२), नाशिक २६.९ (१५.६), निफाड २६.५ (१५.५), सांगली २८.८ (१८.९), सातारा २९.५ (१७.९), सोलापूर ३३ (२०), सांताक्रूझ २९ (१७.२),

डहाणू २५.४ (१७.९), रत्नागिरी ३०.८ (२०.६), छत्रपती संभाजीनगर २९.१ (१६.६), धाराशिव ३०.२ (१६.४), परभणी ३०.६ (१७.४), परभणी कृषी विद्यापीठ ३०.२ (१६.४), अकोला ३०.७ (१८.१), अमरावती ३०.२ (१८.५), भंडारा २८.२ (१७), बुलडाणा २९.५ (१७.२), ब्रह्मपुरी ३०.१ (१७), चंद्रपूर ३०, गडचिरोली २९.४ (१७.७), गोंदिया २९.५ (१६.९), नागपूर २९.४ (१७.७), वर्धा २९.५ (१७), वाशीम ३०.४ (१९), यवतमाळ ३०.५.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT