Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : वादळी पूर्वमोसमी पावसाचा इशारा कायम

Rain Update : पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी हजेरी लावल्याने राज्यात उन्हाचा चटका ओसरला आहे.

अमोल कुटे

Pune News : पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी हजेरी लावल्याने राज्यात उन्हाचा चटका ओसरला आहे. आज (ता. १४) राज्यात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्याचा इशारा कायम आहे. उत्तर कोकणात उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. राज्यात उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.

सोमवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अमरावती, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, नांदेडसह राज्याच्या काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. ढगाळ आकाशामुळे उन्हाचा चटका कमी होत कमाल तापमानात घट झाली आहे. अमरावती येथे उच्चांकी ४१.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दक्षिण कर्नाटक आणि चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर वायव्य मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कर्नाटक पर्यंत चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आज (ता. १४) राज्यात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा इशारा कायम आहे. तर उत्तर कोकणातील पालघर, ठाणे, मुंबईमध्ये उष्ण लाट आणि उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.

सोमवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.४, धुळे ४०.०, जळगाव ४०.५ कोल्हापूर ३३.७, महाबळेश्वर २७.६, मालेगाव ३८.८, नाशिक ३४.१, निफाड ३४.०, सांगली ३४.९, सातारा ३३.४, सोलापूर ३७.४, सांताक्रूझ ३४.५, डहाणू ३४.७, रत्नागिरी ३१.८,

छत्रपती संभाजीनगर ३५.६, बीड ३८.२, नांदेड ३९.२, धाराशिव ३८.२, परभणी ३८.१, अकोला ४०.१, अमरावती ४१.८, बुलडाणा ३४.०, ब्रह्मपुरी ४१.३, चंद्रपूर ४०.०, गडचिरोली ३९.६, गोंदिया ३८.८, नागपूर ३८.२, वर्धा ४०.८, वाशीम ४१.६, यवतमाळ ४०.५.

उष्ण लाटेचा पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT