Weather Agrowon
हवामान

Maharashtra Heatwave: उन्हाचा चटका तापदायक, पुण्यात ३५.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद!

Maharashtra Temperature Update: राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून, ब्रह्मपुरी येथे तापमान ३८ अंशांवर पोचले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याचा इशारा दिला आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्याच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. ब्रह्मपुरी येथे तापमानाचा पारा ३८ अंशांवर पोचला आहे. राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान ३६ अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरू लागला आहे. आज (ता. १९) राज्याच्या कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नैॡत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मंगळवारी (ता. १८) पंजाबच्या पठाणकोट येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्याच्या किमान तापमानात वाढ होऊ लागली असून, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बुहतांश ठिकाणी किमान तापमान १४ ते २० अंशांच्या दरम्यान होते.

राज्याच्या कमाल तापमानात वाढ होत असून, मंगळवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला, सोलापूर, सांगली, जेऊर, परभणी येथे तापमान ३७ अंशांच्या वर होते. उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या असून, उकाड्यामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. आज (ता. १९) कमाल तापमानात १ ते २ अंशांची वाढ होण्याची, तर किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. १८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३५.७---१५.१

अहिल्यानगर---३४.८---१४.४

धुळे---३६.५---१४.६

जळगाव---३४.४---१३.८

जेऊर---३७.०---१४.५

कोल्हापूर---३४.६---२०.०

महाबळेश्वर---३१.६---१७.६

मालेगाव---३४.०---१५.८

नाशिक---३५.२---१४.५

निफाड---३४.०---१०.५

सांगली---३७.२---१८.०

सातारा---३६.२---१६.३

सोलापूर---३७.३---१९.६

सांताक्रूझ---३३.४---१९.७

डहाणू---३२.२---१८.५

रत्नागिरी---३५.१---१९.३

छत्रपती संभाजीनगर---३६.२---१६.०

धाराशिव---३४.२---१७.०

परभणी---३७.०---१८.४

परभणी (कृषी)---३४.९---१२.९

अकोला---३७.६---१७.८

अमरावती---३६.४---१५.४

भंडारा---३५.८---१८.०

बुलडाणा---३५.०---१९.२

ब्रह्मपुरी---३८.०---१७.०

चंद्रपूर---३६.२---निरंक

गडचिरोली---३६.०---१७.४

गोंदिया---३४.८---१६.०

नागपूर---३५.४---१६.२

वर्धा---३६.५---१६.२

वाशीम---३५.६---निरंक

यवतमाळ---३४.०---१६.२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT