Winter Season Agrowon
हवामान

Maharashtra Weather: ऐन थंडीत उन्हाचा चटका; राज्यातील किमान तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता

Weather Update: आजपासून किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील तापमानातील चढ उतार सुरुच आहेत. राज्यातील काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवत आहे. आजपासून किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

उत्तर भारतातील अनेक भागात आज तापमानात वाढ झाली. आज पंजाबमधील आदामपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर गुजरात आणि परिसरावर ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १३० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. उत्तर भारतातील थंडी कमी जास्त होत आहे. तर काही भागात सकाळी धुक्याची चादर कायम आहे. 

राज्यातील ढगाळ हवामान आणि पावसाचे सावट दूर झा आहे. राज्याच्या अनेक भागात निरभ्र आकाश आहे. तर काही ठिकाणी सकाळी धुके आणि दव पडत आहेत. आज निफड येथील गहू संशोधन केंद्रात ११.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान ११ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. तर कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. सोलापूरमध्ये सर्वाधिक ३६.३ अंश सेल्सिअस तापमनाची नोंद झाली होती. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Issue: अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले

RTE Admission: राज्यात आरटीई प्रवेशाच्या जागांमध्ये मोठी घट

Rabi Crops: पावणेअठरा लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र

Sangli Water Crisis: सांगलीमध्ये तीन महिन्यांत पाणीसाठ्यात २८ टक्के घट

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

SCROLL FOR NEXT