Summer Sowing Agrowon
हवामान

Summer Sowing : नांदेड जिल्ह्यात उन्हाळी हंगामात २७ हजार हेक्टरवर पेरणी

Summer Crop : रब्बी हंगामातील पेरणीनंतर शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात २७ हजार ५४४ हेक्टरवर पेरणी केली आहे. यात सर्वाधिक आठ हजार ७११ हेक्टरवर उन्हाळी भुईमुगाचा समावेश आहे.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीनंतर शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात २७ हजार ५४४ हेक्टरवर पेरणी केली आहे. यात सर्वाधिक आठ हजार ७११ हेक्टरवर उन्हाळी भुईमुगाचा समावेश आहे. यासोबतच भात, सूर्यफूल, तीळ, मका, ज्वारी पिकांची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.

जिल्ह्यात मागील वर्षी पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या ९९.५० टक्के पाऊस झाला होता. यामुळे जिल्ह्यातील लहान, मध्यम व मोठ्या प्रकल्पांसह कोल्हापुरी बंधारे, उच्च पातळी बंधाऱ्यात चांगला पाणीसाठा झाला होता. यामुळे रब्बी हंगामात सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या १५५ टक्क्यांनुसार साडेतीन लाख हेक्टरवर पेरणी झाली होती.

यात शेतकऱ्यांनी दोन लाख ३८ हजार हेक्टरवर हरभरा, ५० हजार ७११ हेक्टरवर रब्बी ज्वारी, चाळीस हजार हेक्टरवर गहू पेरणी केला होता. यानंतर जलसंपदा विभागाने उन्हाळी हंगामासाठी पाण्याचे नियोजन केल्यामुळे शेतकऱ्यांनी २७ हजार ५४४ हेक्टरवर उन्हाळी हंगामात पेरणी केली आहे.

यात आठ हजार ७११ हेक्टरवर उन्हाळी भुईमूग, उन्हाळी ज्वारी नऊ हजार ३९३ हेक्टर, मका चार हजार हेक्टर, उन्हाळी भात ३७९ हेक्टर, उन्हाळी सोयाबीन ५०६ हेक्टर, उन्हाळी तीळ चार हजार २५१ हेक्टर, सूर्यफूल ७५ हेक्टर अशी एकूण पेरणी २७ हजार ५४४ हेक्टरवर झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

उन्हाळी सोयाबीनची पेरणी घटली

शेतकऱ्यांनी पेरणीसाठी सोयाबीन पेरण्याचे आवाहन केले होते. यानुसार मागील उन्हाळी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली होती. यात सोयाबीन सहा हजार ९२१ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा मात्र याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. उन्हाळ्यात केवळ ५०६ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. तर तीळ, सूर्यफूल, मका, ज्वारीच्या पेऱ्यात मात्र यंदा वाढ झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Farming Maharashtra : हवामान बदल, नवीन वाण, देशांतर्गत बाजारपेठ आणि द्राक्ष निर्यातीवर मंथन

Rainfall Update : जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची हजेरी

Satara Water Crisis : माण, खटावच्या ४२ गावांत टँकरने पाणी

Pomegranate Farming : जेऊर कुंभारीतील डाळिंब शेतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

Election Commission Row: ज्ञानेश कुमारांनी ४८ तासांत राजीनामा द्यावा अन्यथा देशव्यापी आंदोलन, 'सीजेपी'चा इशारा, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT