Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

Weather Forecast : वादळी पावसाने उघडीप देताच थंडीची चाहूल लागली आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाल्याने सकाळी हवेत गारवा आला असून, धुक्यासह दव पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

अमोल कुटे

Pune News : वादळी पावसाने उघडीप देताच थंडीची चाहूल लागली आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाल्याने सकाळी हवेत गारवा आला असून, धुक्यासह दव पडल्याचे चित्र दिसून येत आहे. सकाळी गारठा वाढू लागला असतानाच, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. यातच राज्यात तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान तयार होत आहे.

बंगालच्या उपसागरातील ‘डाना’ तीव्र चक्रीवादळ जमिनीवर येताच निवळून गेले आहे. उत्तर ओडिशा आणि परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून ही प्रणाली ओसरणार आहे. नैर्ऋत्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. लक्षद्वीपपासून उत्तर तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

वादळी पाऊस थांबताच राज्यात आकाश निरभ्र होत, स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर आल्याने उन्हाचा चटका वाढल्याचे दिसून येत आहे. यातच पहाटेच्या वेळी हवेत गारठा वाढू लागला आहे. शनिवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी ३५.६ अंश तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरी येथे तापमान ३५ अंशावर असून, सोलापूर, डहाणू, वाशीम, अकोला, अमरावती येथे पारा ३४ अंशांपार आहे.

महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात पारा १७ अंशांच्या खाली आला आहे. राज्याचे किमान तापमानात हळूहळू घट होत थंडी वाढत जाणार आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल आणि किमान तापमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३२.७ (१६.७), अहिल्यानगर ३१ (१६.७), जळगाव ३३.९ (१८.५), कोल्हापूर ३०.६ (२१.६), महाबळेश्वर २८ (१५), मालेगाव ३१.४ (२१), नाशिक ३१.८ (१६.७), निफाड ३१ (१६.२), सांगली ३१.६ (१९.१), सातारा ३१.८ (१७.६), सोलापूर ३४.८ (१९.५), सांताक्रूझ ३५.६ (२१.४), डहाणू ३४.८ (२१.७),

रत्नागिरी ३२.६ (२४.५), छत्रपती संभाजीनगर ३२.४ (१९.३), बीड ३०.५ (-), धाराशिव - (१९.२), परभणी ३२.६ (२०.९), अकोला ३४.३ (२१.५), अमरावती ३४.२ (२०.१), भंडारा ३० (२६.०), बुलडाणा २९.६ (२१.३), ब्रह्मपुरी ३५ (२०.९), चंद्रपूर ३२.६ (२०.४), गडचिरोली ३३ (२०.६), गोंदिया ३३.९ (२१), नागपूर ३३.१ (१९.२), वर्धा ३३.९ (२१), वाशीम ३४.६(-), यवतमाळ ३२ (१९.५).

३४ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे : सांताक्रूझ ३५.६, ब्रह्मपुरी ३५, सोलापूर ३४.८, डहाणू ३४.८, वाशीम ३४.६, अकोला ३४.३, अमरावती ३४.२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT