Cold Weather Agrowon
हवामान

Cold Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता

Winter Update : उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आहे. राज्याच्या किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असल्याने आजपासून (ता. ५) थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, उत्तर पंजाबपासून पश्चिम-मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. यातच पश्चिमी चक्रावातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये हलक्या पावसासह हिमालय लगतच्या भागात हिमवृष्टी होत आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका सातत्याने कमी-अधिक होत आहे. रविवारी (ता. ५) मध्य प्रदेशातील मंडला येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात आकाश निरभ्र होत, स्वच्छ सूर्य प्रकाश जमीनीवर येत असल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळी गारठा आणि दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवत आहे. किमान तापमान १० अंशांच्या खाली तर कमाल तापमान ३० अंशांच्या वर गेले आहे. रविवारी (ता. ५) परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील नीचांकी ६ अंश तापमान नोंदले गेले. तसेच धुळे, अहिल्यानगर, नागपूर, ब्रह्मपूरी, गोंदिया येथे किमान तापमान १० अंशाखाली आले होते.

रविवारी (ता. ५) सकाळपर्यंच्या २४ तासांत सांताक्रुझ येथे ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ५ ) राज्याच्या किमान तापमानातील घट कायम राहणार असून, आजपासून (ता. ६) राज्यात गारठा हळूहळू वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

रविवारी (ता. ५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३१.४---११.२

अहिल्यानगर---३२.२---९.७

धुळे---३२.५---७.६

जळगाव---३१.०---११.२

जेऊर---३२.५---११.०

कोल्हापूर---३०.२---१५.३

महाबळेश्वर---२७.०---१५.०

मालेगाव---(२७.४)---१२.२

नाशिक---३१.३---१३.४

निफाड---३०.३---१०.५

सांगली---३१.८---१३.२

सातारा---३३.१---१२.०

सोलापूर---३४.२---१३.६

सांताक्रूझ---३५.०---१९.०

डहाणू---३०.३---१८.३

रत्नागिरी---३३.७---१७.४

छत्रपती संभाजीनगर---३१.४---१३.६

धाराशिव---(३०.५)---११.०

परभणी---३१.४---११.५

परभणी (कृषी)---३०.२---६.०

अकोला---३२.८---१२.८

अमरावती---३२.६---११.९

भंडारा---२९.८---११.८

बुलढाणा---३०.८---१५.६

ब्रह्मपूरी---३३.२---१०.०

चंद्रपूर---३०.६---(-)

गडचिरोली---३०.२---११.०

गोंदिया---२९.८---९.०

नागपूर---३१.६---८.८

वर्धा---३१.४---१०.२

वाशीम---३१.८---१४.८

यवतमाळ---३१.०---१०.६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT